पुण्यात ठरणार भाजपच्या ‘महाविजया’ ची रणनीती; 7 जानेवारीला खास बैठक
पुणे : आगामी 2024 च्या लोकसभेत (Loksabha Election 2024) विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजपकडून (BJP) राज्य आणि देशपातळीवर मायक्रो प्लॅनिंग केले जात आहे. तिसरी बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार असा नारा देत भाजपनं लोकसभेसाठी रणशिंग फुंकले असून, महाविजय 2024 साठीची रणनीती पुण्यात आखली जाणार आहे. येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेर परिसरात एका खास बैठकीचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे.
स्वाभिमानी ‘मविआ’त? ठाकरे-शेट्टी भेटीवर टीका केलेल्या जाधवांची जिल्हाप्रमुख पदावरुन हकालपट्टी
कोण करणार मार्गदर्शन
आगामी लोकसभेसाठीची ही बैठक बाणेर येथील बंटारा भवन हॉल येथे 7 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 ते 5.30 या वेळेत होणार असून, बैठकीत सहभागी होणाऱ्या खास निमंत्रितांना राष्ट्रीय संघटक सरचिटणीस बी. एल. संतोष, राष्ट्रीय संहसंघटक मंत्री शिव प्रकाश यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत.
सर्व्हेक्षणातील आकडेवारीची महायुतीला धडकी
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार असे त्रिशूळ सरकार अस्तित्वात आले आहे. एकीकडे हे तिन्ही नेते सरकार वेगाने काम करत असल्याचे वेळोवेळी सांगत आहेत. परंतु, 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील असा अंदाज एका समोर आलेल्या सर्व्हेक्षणातून वर्तवण्यात आला आहे. या आकडेवारीनंतर भाजपसह महायुतीतील नेत्यांना धडकी भरली आहे.
Jitendra Awhad : …तर आव्हाडांचा वध करणार; वादग्रस्त विधानानंतर परमहंस आचार्य यांचा थेट इशारा
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा असून, नुकत्याच कऱण्यात आलेल्या एका सर्व्हेक्षणात लोकसभेच्या 48 जागांपैकी सर्वाधिक म्हणजेच 26 ते 28 जागा मविआला मिळतील असे सांगण्यात आले आहे. शिंदे-फडणवीसांच्या महायुतीला 19 ते 21 जागा तर, 2 जागा इतरांना मिळू शकतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रासाठी भाजपचं ‘मिशन 45’
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. त्यातील 2024 च्या लोकसभेत भाजपनं विजयासाठी मिशन 45 निश्चित केलं आहे. यासाठी अगदी ग्राऊंड लेव्हलला जाऊन काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 7 जानेवारी रोजी पुण्यातील बाणेरमध्ये खास निमंत्रितांसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, या बैठकीसाठी पुण्यातील आणि महाराष्ट्रातील नेमक्या कोण कोणत्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे याची कोणतीही माहिती भाजपकडून देण्यात आलेली नाही.
मोदींच्या मांडणीने खासदारही थक्क होतात; पाठ थोपटत पवारांनी अखेर संधी साधली
मविआतील अंतर्गत वाद अन् भाजपची रणनीती
सर्व्हेक्षणातील आकडेवारीनंतर महायुतीची धाकधूक वाढलेली असताना दुसरीकडे आकडेवारीनंतर मविआतील नेत्यांचा विश्वास अधिक वाढला आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी तर आतापर्यंत आम्हाला 28 जागा मिळतील असे सांगितले जात होते. परंतु, मविआ राज्यात 35 ते 40 जागांर विजय मिळवेल असा दावा राऊतांनी केला आहे. मात्र, दुसरीकडे मविआमध्ये लोकसभेच्या जागा वाटपावरून अंतर्गत वाद सुरू आहेत.
काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांकडून जागांबाबत थेट दावे केले जात आहेत. मात्र, याबाबत अद्यप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. जागा वाटपावरून मविआत सुरू असलेल्या याच अंतर्गत वादाचा कसा फायदा करून घेता येईल यासाठी पुण्यातील बैठकीत खास आणखी भाजप करू शकेल असा अंदाज बांधला जात आहे.