PM Modi ‘बस मणिपूर नही जायेंगे’ म्हणत मोदींच्या लक्षद्वीप समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंवर काँग्रेसचा हल्लाबोल
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) लक्षद्वीप दौऱ्यादरम्यान समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या पोज आणि ड्रेसेसमधील फोटोंवरून काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘बस मणिपूर नही जायेंगे’ असं म्हणत मोदींच्या या फोटोंचा कोलाज शेअर करत कॉंग्रेसकडून ही टीका करण्यात आली आहे.
कतरिना कैफच्या मेरी ख्रिसमसमधील ‘नजर तेरी तुफान’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (4 जानेवारीला) केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची संवाद साधला. तसेच या दौऱ्याची खास गोष्ट म्हणजे यावेळी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर पंतप्रधान मोदींनी स्नॉर्कलिंगचा आनंद लुटला. या समुद्रकिनाऱ्यावरच्या सफरीचे आणि एडवेंचरचे नयनरम्य फोटो त्यांनी त्यांच्या एक्स या सोशल मिडीया हँडलवर शेअर केले. यावरूनच काँग्रेसने त्यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केलाय.
8 महीनों से मणिपुर जल रहा है…
अभी भी लोगों की हत्याएं हो रही हैं. भारत के नागरिक मारे जा रहे, बेघर हैं, प्रताड़ना झेल रहे हैं.
लेकिन… भारत के प्रधानमंत्री कहां हैं? आप खुद देख लीजिए 👇
भारत के प्रधानमंत्री मौज कर रहे हैं. समंदर के किनारे बढ़िया फोटोबाजी हो रही है.… pic.twitter.com/nlExo5aunB
— Congress (@INCIndia) January 4, 2024
काँग्रेस पक्षाच्या एक्स या सोशल मिडीया हँडलवरून एक फोटो पोस्ट करण्यात आला. ज्यामध्ये मोदींनी लक्षद्वीपच्या समुद्रकिनाऱ्यावर केलेल्या सफरीचे फोटोंचा कोलाज करण्यात आला होता. यावर लिहिण्यात आलं होतं. ‘बस मणिपूर नही जायेंगे’. तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये काँग्रेसने लिहिलं की, आठ महिन्यांपासून मणिपूर जळत आहे. अजून देखील लोकांच्या हत्या होत आहेत. भारतीय नागरिक मारले जात आहेत.
‘आधी अनधिकृत आता अधिकृतपणे फोन टॅप होणार’; शुक्लांची नियुक्ती होताच खडसेंचा आरोप
लोक बेघर आहेत. अनेक महिलांची प्रतारणा होत आहे. मात्र भारताचे पंतप्रधान कुठे आहेत? तुम्हीच पहा. भारताचे पंतप्रधान मज्जा करत आहेत. समुद्रकिनारी चांगलीच फोटोबाजी सुरू आहे. वेगवेगळ्या ड्रेसमध्ये फोटो घेतले जात आहेत. शानदार पोज दिल्या जात आहेत. कधी किनाऱ्यावर पहुडलेले. तर कधी समुद्राच्या लाटांशी खेळताना. मज्जाच मज्जा सुरू आहे. जबाबदाऱ्यांपासून पाळण्यामध्ये पंतप्रधान मोदी माहीर आहेत. असं म्हणत मोदींच्या आजच्या लक्षद्वीप दौऱ्यावर काँग्रेसकडून चांगलाच निशाणा साधला साधण्यात आला आहे.