Download App

भाजप आमदाराची मागणी, जयंत पाटलांचे आव्हान अन् फडणवीसांनी केली मोठी घोषणा

  • Written By: Last Updated:

Jayant patil : आमदार समीर कुणावार (Sameer Kunawar) यांनी हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाचा दाखला देत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर उत्तर देण्यासाठी उभा राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी थेट नवीन महाविद्यालयाची घोषणा केली.

तालिका सभापती समीर कुणावार यांना उद्देशून जयंत पाटील म्हणाले होते की वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुम्हाला पायऱ्यांवर बसायची वेळ आली पण तुमच्याकडे बघायला देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) वेळ नाही. कारण बाकीचे कामे त्यांना फार महत्त्वाची आहेत. तुमचं धाडस नाही. त्यांना तिथून आदेश द्या की आज अधिवेशन संपायच्या आत मेडिकल काँलेजची घोषणा करा, अशी मिश्लिल टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली होती.

पुढं जयंत पाटील म्हणाले की मी सांगलीचा पण तुमच्या वर्ध्याला कसं काम करायचं हे सांगायची वेळ आली. तुमच्यावर अन्याय किती? मला तुमच्याबद्दल पूर्ण सहानुभूती आहे. पण हे लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत. तुमची काम करत नाहीत. कामं कोणाची करत आहे तर आमच्याकडून तुमच्याकडे गेलेल्यांची. 105 लोकं लांबून येऊन पत्र देतात, असे त्यांनी म्हटले.

Winter Session : कौतुक करत जयंत पाटलांचे फडणवीसांना चिमटे; गृहखात्याचा काढला कच्चाचिठ्ठा

त्यानंतर सभागृहात उत्तर देण्यासाठी उभा राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमदार समीर कुणावार यांच्या मागणीला अनुसरून हिंगणघाट हे ठिकाण वैद्यकीय महाविद्यालयासाठी योग्य आहे. त्याठिकाणी नवीन महाविद्यालय सुरु करण्यास सुयोग्य जागा वर्धा जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध करुन द्यावी, असा निर्णय घेण्यात आला आहे.

जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, ड्रग्ज, दंगलीवरुन सभागृहात खडाजंगी…

फडणवीस पुढं म्हणाले की वर्धा जिल्ह्यामध्ये नवीन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वर्धा शहर, हिंगणघाट व तळेगाव ता. आष्टी या तीन ठिकाणच्या जागांसंदर्भात सर्वसमावेशक चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आयुर्विज्ञानच्या मानकानुसार 100 एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी 420 खाटांचे दोन वर्षापासून कार्यरत असलेले रुग्णालय संलग्नित असणे आवश्यक आहे. तथापि वर्धा येथे 286 खाटांचे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. त्यामुळे राष्ट्रीय आयुर्विज्ञानाची मानके पूर्ण होत नाहीत. तसेच वर्धा येथे एक अभिमत वैद्याकीय महाविद्यालय व शासकीय मान्यता असलेले महाविद्यालय अस्तित्वात असल्याने त्याच ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालय सुरु करणे उचित होणार नाही.

Amol Kolhe : ‘शेतकरी अन् कांदा निर्यातबंदीवर जाब विचारला म्हणून निलंबन’; कोल्हेंनी सांगितली वेगळी स्टोरी

ते पुढं म्हणाले की या व्यतिरिक्त हिंगघाट व तळेगाव ता. आष्टी येथे महाविद्यालय सुरु करावयाचे झाल्यास येथे पर्याप्त क्षमतेचे रुग्णालय नसल्याने प्रथम 430 खटांच्या रुग्णालयाचे बांधकाम करावे लागेल. त्यानंतर दोन वर्षांनी नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अर्ज करता येईल.

तसेच वर्धा जिल्ह्यातील आर्वी, आष्टी किंवा आजूबाजूच्या तालुक्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधा पाहता तळेगाव ता. आष्टी येथे नव्याने मान्यता देण्यात आलेल्या 300 खाटांच्या सामान्य रुग्णालयाच्या उभारणीस गती देण्यात येईल. तेथे देखील राष्ट्रीय आयुर्विज्ञानच्या मानकांची पुर्तता झाल्यानंतर जागतिक बॅकेच्या अधिनस्थ इंटरनॅशनल कॉपोरेशनसोबत राज्य सरकारच्या झालेल्या करारानुसार व्हीपीपी तत्त्वावर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास शासन प्राधन्याने विचार करेल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Tags

follow us