महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाला नवं वळण, भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

  • Written By: Published:
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणाला नवं वळण, भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Sadan Scam Case: महात्मा फुलेंचं नाव घेत राजकारण करणारे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा (Maharashtra Sadan) प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या खटल्यातील तीन आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याचं न्यायालयाने मान्य केलं आहे. या प्रकरणातील आरोपींची याचिका मुंबई सत्र न्यायालयाच्या (Bombay Sessions Court)विशेष न्यायालयाने मान्य केली आहे. हा भुजबळांसाठी मोठा धक्का मानला जातोय.

Madhuri Pawar : ‘रानबाजार’ फेम माधुरी पवारचा बोल्ड अंदाज 

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज हे तीन आरोपी अटकेत आहेत. या तीन आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्याकडे माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. याच प्रकरणात प्रकरणात मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्यासह इतरांनी दोषमुक्तीसाठी अर्ज दाखल केला आहे. यावर कोर्टात सुनावणी सुरू होती. मात्र, ही सुनावणी थांबवून आधी आमच्या माफीचे साक्षीदार होण्याच्या अर्जावर निर्णय घ्या, अशी या तिघांनी विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली.

किंग खान की प्रभास सर्वात महागडा अभिनेता कोण? जाणून घ्या ‘या’ सिनेमासाठी किती घेतलं मानधन 

काय आहे महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण?

दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आरोपपत्रात छगन भुजबळ यांच्यावर कंत्राट कंपनीकडून साडे तेरा कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे.

अंधेरीमधील आरटीओच्या जमिनीवर झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाला परवानगी देताना त्या बदल्यात संबंधित कंपनीकडून दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या इमारतीची पुनर्बांधणी, तसंच मलबार हिल येथे विश्रामगृह बांधून घेण्यासाठी राज्य सरकारने कंत्राट दिलं होतं. या कामासाठी कोणतीही निविदा प्रक्रिया झाली नाही. पुढं संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीशी कंपनीशी करार करून विकासकामाचे हक्क विकले. सरकारी निकषांप्रमाणे कंत्राटदार कंपनीला २० टक्के नफा अपेक्षित असतांना पहिल्या विकासकाला ८० टक्के नफा मिळाला. त्यातील साडे तेरा कोटी कंपनीने भुजबळांना दिले, असा आरोप आहे.

या प्रकऱणात मुंबई सत्र न्यायालयात भुजबळ यांची निर्दोष सुटका केली होती. मात्र, ईडीनेही या प्रकरणात पीएमएलए अंतर्गत कारवाई केली. त्याठिकाणी देखील भुजबळांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला. दरम्यान, आता सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीचे साक्षीदार होण्यासाठी अर्ज दाखल केल्यान भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube