Download App

वेगळ्या विदर्भासाठी फडणवीसांच्या घरावर लॉग मार्च, आक्रमक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं

Nagpur news : नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन पुकारले आहे. संविधान चौकापासून फडणवीसांच्या घरापर्यंत हा लॉग मार्च काढण्यात आला आहे. लॉग मार्चमुळे विदर्भवाद्यांची संविधान चौकात मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. वेगळ्या विदर्भासह अनेक मागण्या या मोर्चामधून करण्यात येत आहेत.

वेगळ्या विदर्भासाठी मोर्चेकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी फडणवीसांच्या घरासमोर बॅरिकेट लावले आहेत. एका तरुण मोर्चेकरी म्हणाला की आम्हाला वेगळा विदर्भा पाहिजे, आमच्या हाताला काम नाही, रोजगार नाही यासाठी हा मोर्चा काढला आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांनी वेगळा विदर्भ देण्याचे अश्वासन दिले होते. त्यांनी अश्वासनाची पूर्तता केली नाही म्हणून हा मोर्चा काढला आहे, असे मोर्चेकऱ्याकडून सांगण्यात आले.

प्रा. हरी नरके यांच्या निधनाने ओबीसी चळवळीची मोठी हानी : छगन भुजबळ

ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आज विदर्भावादी कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर विदर्भावादी आक्रमक झाले आहेत. नागपूर येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर काही विदर्भवादी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

वेगळा विदर्भा राज्य ही विदर्भावादी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यासोबतच वीज दरवाढीसह इतर मागण्यासांठी विदर्भावाद्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे. विदर्भामध्ये काही जुने औष्णिक वीज प्रकल्प आहेत, त्यासोबत नव्यानेही प्लांट उभारले जात आहेत. मात्र, विदर्भातील जनतेला त्याचा कोणताही फायदा होत नाही. विदर्भातील जनतेला वीज दरात सूट देण्यात यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. उलट औष्णिक वीज प्रकल्पांमुळे प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे या प्रकल्पांना विदर्भावाद्यांचा विरोध आहे.

Tags

follow us