Download App

Wardha Lok Sabha : कॉंग्रेसचा नेता तुतारी फुंकणार! कराळे मास्तर ऐवजी अमर काळेंच्या नावावर शिक्कामोर्तब

  • Written By: Last Updated:

Wardha Lok Sabha 2024: लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेल नाही. मात्र, लोकसभेसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाचे पहिले 9 संभाव्य उमेदवार ठरले आहे. यात वर्धा लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे माजी आमदार अमर काळे (Amar Kale) यांच्या नावावर महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं. या उमेदवारीबाबत खुद्द अमर काळेंनी दुजोरा दिला आहे. तसेच शरद पवार गटाची तुतारी लवकरच हाती घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !

वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळेंच्या नावाला राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाने संभाव्य उमदेवारी दिली. हा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसकडे होता. यंदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे मतदारसंघ केला. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला येथं संधी मिळाली. दरम्यान, महाविकास आघाडीकडून वर्धा लोकसभेची उमेदवारी आपल्याला मिळाली याबाबत काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी दुजोरा दिला आहे. नुकतेच ते वर्ध्याला पोहोचले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.

Don 3: कियारा- रणवीर सिंगच्या ‘डॉन 3’ चित्रपटाच्या शूटिंगबाबत मोठी अपडेट समोर

भाजपच्या हुकूमशाहीला शह देण्यासाठी रिंगणात
यावेळी त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने आपण राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचेही सांगितले आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीला शह देण्यासाठी आपण रिंगणात उतरलो आहोत. सध्या ही यादी संभाव्य यादी आहे, पण मी कॉंग्रेस पक्षाच्या संमतीने तुतारी चिन्हावर लढण्यसााठी सज्ज झालो, असल्याचं ते यावेळी म्हणाले.

पुढ बोलतांना ते म्हणाले, इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवणार आहोत. देशाचे संविधान वाचवण्यासाठी आपले लोकसभा हे ट्रार्गेट असून माझं नाव जळपास कन्फर्म झालं आहे. केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. नुकतीच लोकसभेच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून आता कार्यकर्तेही तुतारी चिन्हावर लढण्याचा आग्रह धरत आहेत. राहुल गांधींच्या काँग्रेसच्या सभेसाठी मी मुंबईला गेलो होतो आणि परतताना मात्र तुतारी हाती घेऊन आल्याचाी प्रतिक्रिया अमर काळे यांनी दिली.

महायुतीकडून रामदास तडस लढणार
या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांमध्ये कमालीची उदासीनता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने अमर काळे यांना उमेदवारी देऊन नवचैतन्य निर्माण केले आहे. महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या प्रचाराचा आणि निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही वर्ध्याला भेट दिली. या आढावा बैठकीत या दोघांनी भाजप नेत्यांना एकसंध ठेवून लोकसभा निवडणुकीच्या कामाला गती देण्याच्या सूचना दिल्या.

follow us

वेब स्टोरीज