Lok Sabha Election 2024 : सध्या देशात लोकसभेची तयारी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांना लोकसभेसाठी (Lok Sabha Election ) जोरदार कंबर कसली. अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, या जागेसाठी ठाकरे गट इच्छुक असल्याचं बोलल्या जातं आहे. बबलीला गाडायचं असेल तर अमरावतीची जागा ठाकरे गटाला सोड़ावी, अशी मागणी शिवसैनिक करत आहे.
Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!
अमरावती मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी यांनी तयारी केली होती. मात्र, कॉंग्रेसने बळवंत वानखडे यांना मविआमधून उमेदवारी जाहीर केली. अमरावती लोकसभेतून दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी आज माध्यमांशी बोलतांना सांगितलं की, आमच्या पक्ष प्रमुखांचा निर्णय आमच्यासाठी महत्वाचा आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही मान राखू. मात्र, कित्येक वर्ष इथं शिवसेनेचा खासदार होता. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. शिवसेनेनं या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात काम केलेली आहेत. विद्यमान खासदारांची मतदारसंघात फारशी काम केली नाहीत. नवनीत राणा यांनी अनेकदा आमच्या पक्ष प्रमुखांवर टीका केली. त्याचा वचपा काढण्यासाठी तरी अमरावतीची जागा ठाकरे गटाकडे यांनी अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.
मनोज जरागेंना तडीपार करणार का? गृहमंत्री फडणवीसांनी थेटच सांगितलं…
तर अन्य शिवसैनिकांना बोलतांना सांगितलं की, उद्धव ठाकरेंचा निर्णय अंतिम राहिलं. आम्ही त्यांच्या शब्दाबाहेर नाही. मात्र, शिवसैनिकांच्या भानेचाही आदर व्हावा. अमरावतीची जागा शिवसेनाला मिळावी, यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत. बंटी आणि बबलीली गाडायचं असेल तर इथं ठाकरे गटालाच उमेदवारी मिळावी, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी बोलून दाखवली.
अमरावतीतून महायुतीच्या वतीने खासदार नवनीत राणा यांना उमदेवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, राणा यांच्या उमेवारीला शिंदे गटासह आमदार बच्चू कडू यांच्याकडून विरोध आहे. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणा यांनाच उमेदवारी मिळेल, असं सांगितलं. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. अमरावती मतदारसंघात काही मतभेद आहेत. बच्चू कडू किंवा अडसूळ यांच्यात मतभेद असतील. मात्र नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी सगळेच प्रयत्न करतील, असं बावनकुळे म्हणाले.