Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून राजकीय (Lok Sabha Election) पक्षांत जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. नेतेमंडळींकडून दबावाचे राजकारण सुरू झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर दावा सांगणाऱ्या भाजपकडून (BJP) आता बुलडाण्यावरही दावा सांगितला जात आहे. त्यावरूनच आता शिंदे गटात अस्वस्थता वाढू लागली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी स्पष्ट शब्दांत भाजपला ठणकावले आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही ही जागा भाजपला सोडणार नाही, असे गायकवाड यांनी सांगून टाकले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Telangana Election : 35 वर्षात तब्बल 237 निवडणुका; KCR यांना टक्कर देणारा ‘इलेक्शन किंग’ कोण?
आमदार गायकवाड यांचे बॅनर काही ठिकाणी लावले आहेत. त्यामध्ये संसदेचाही फोटो आहे. याबाबत विचारल्यावर त्यांनी सांगितले की वेळप्रसंगी आपणही निवडणूक लढवू शकतो. आम्ही ही जागा कोणत्याही परिस्थितीत भाजपला सोडणार नाही. वेळ आली तर शिवसेनेची ही जागा राखण्यासाठी मी स्वतः लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेऊ शकतो.
मी इच्छुक नाही पण, वेळ आली तर..
बुलढाणा आणि आमच्या 13 खासदारांच्या मतदारसंघांचा सर्व्हे भाजपने केला आहे. त्यात बुलढाण्याची जागा चार नंबरवर दाखवली आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत नाही. त्यामुळे ही जागा आम्हाला द्यावी अशी मागणी भाजपने केली आहे. परंतु, आम्ही ही जागा भाजपला सोडणार नाहीच. मी लोकसभेसाठी इच्छुक नाही. पण ही जागा जर भाजपकडून मागण्यात येत असेल आणि अटीतटीची वेळ आली. ते जर प्रतापराव जाधव यांनी तिकीट देत नसतील तर मग मी ही जागा कायम ठेवण्यासाठी निवडणूक लढवू शकतो, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
Lok Sabha Election : 2024 साठी खडसेंची मोठी घोषणा! तिकीट मिळाल्यास रावेरमधून लढणार
कल्याण मतदारसंघाचा दावा भाजपने सोडला ?
दरम्यान, कल्याण लोकसभा हा विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातला भाजप नेत्यांचा हा दुसरा दौरा असून भाजपच्या नेत्यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे डोळा आहे, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मतदारसंघाबाबत आता भाजपने नरमाईची भूमिका घेतली आहे. त्यांच्या नेत्यांकडून आता या मतदारसंघाची मागणी होत नाही. परंतु, भाजपने अन्य मतदारसंघांकडे मोर्चा वळवल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांत अस्वस्थता वाढली आहे.