Download App

Amravati : धीर गंभीर काँग्रेसच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर चेन्नीथला यांनी आणले हसू

  • Written By: Last Updated:
Image Credit: Letsupp

अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध मुद्द्यांवर ‘एकला चालो रे’ ची भूमिका घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर आज (दि.18) पक्षाचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) यांनी हसू आणल्याचे दिसून आले. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीची सुरुवात अमरावतीतून झाली. त्याचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या चेहऱ्यावर निखळ हसू पाहण्यास मिळाले.

Karuna Munde यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप तर परिणाम भोगावे लागतील म्हणत भाजपला इशारा

पार पडलेल्या या बैठकीत विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले आदी दिसत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण रमेश चेन्नीथला उजव्या हाताला तर, डाव्या हाताला बाळासाहेब थोरात बसलेले दिसत आहेत. या या फोटोत अशोक चव्हाण आणि रमेश चेन्नीथला एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहे. या संवादावेळी चव्हाणांनी रमेश यांना काहीतरी सांगितले. त्यावेळी मंचावर उपस्थित चव्हाणांसह सर्वच नेत्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. आता नेमके चव्हाणांनी काय सांगितले ज्यानंतर हा हशा पिकला याबाबत काही माहिती समोर आलेली नाही. पण जागा वाटपाच्या मुद्द्यावरून धीरगंभीर चेहरे घेऊन फिरणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या चेहऱ्यावर रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत का होईना पण हसू आल्याचे पाहण्यास मिळाले.

मुंबईला जाणारचं! सगेसोयरे, कुणबी प्रमाणपत्राच्या मागण्यांवर मनोज जरांगे ठाम

काँग्रेसचे राज्यातील सर्व नेते एकत्र

महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून सर्व नेते एकत्र आहेत कोणाही पक्ष सोडून जाणार नाही. भारतीय जनता पक्ष अफवा पसरवून दिशाभूल करत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली असल्याचे रमेश यांनी सांगितले.

राम मंदिर उद्घाटनावरून हल्लाबोल

बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाकडून अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाचे भांडवल केवळ राजकीय फायदा उठवण्यासाठी केले जात आहे. मंदीर अजून अर्धवट असून अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे अयोग्य आहे हे शंकराचार्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. परंतु, भाजपाला घाई झाली असून, निवडणुकीतील फायद्यासाठी राम मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट केला जात आहे.

मोदींना वय विचारा! म्हणणाऱ्या नानांवर दादा चिडलेच; ‘नाक खुपसू नका, आम्ही आमचं बघू’

राम मंदिराला काँग्रेसचा विरोध नाही पण…

यावेळी रमेश चेन्नीथला यांनी काँग्रेस पक्ष राम मंदिराच्या विरोधात नाही, सर्वांना आपले धार्मिक स्वातंत्र्य आहे. काँग्रेस पक्षातील अनेक नेतेही अयोध्येला जाऊन आले आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी काँग्रेस नेते व उत्तर प्रदेशचे प्रभारी अविनाश पांडे यांनी सहकाऱ्यांसह अयोध्येला भेट देत रामलल्लाचे दर्शन घेतले. अयोध्येला ज्यांना जायचे आहे त्याला विरोध केलेला नाही. मात्र, भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी हे राजकीय फायद्यासाठी मंदिर उद्घाटनाचा इव्हेंट करत आहेत ते चुकीचे आहे आणि ही बाब जनतेलाही चांगली माहीत आहे.

राहुल गांधींची यात्रा देशासाठी

यावेळी रमेश चेन्नीथला यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरु केली असून या न्याय यात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. भारत जोडो न्याय यात्रा ही निवडणूक यात्रा नाही तर, देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत, ही यात्रा देशासाठी असल्याचे ते म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज