Download App

Vaibhav Naik : ‘व्हायरल क्लिप’चा वाद वाढला! विधिमंडळ परिसरातच भातखळकर-नाईकांत जुंपली

Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये जोरदार शिवीगाळ होत असल्याचं ऐकू येत आहे. या क्लिपवरून राजकारणाचा पारा चढण्यास सुरुवात झाली आहे. या क्लिपवरून आज विधिमंडळ परिसरात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik vs Atul Bhatkhalkar) आणि भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली. दोघांनीही एकमेकांवर जोरदार टीका केली.

ज्या आमदाराने शिव्या दिल्या ते भाजपाचे माजी मंत्री आहेत. खरंतर भाजपला कोणताच धाक राहिलेला नाही. कोकणातील आमदार आहेत राणे त्यांनी सुद्धा अनेक वेळा शिव्या दिलेल्या आहेत. हे रेकॉर्डवर आहे. लोकप्रतिनिधीनीच कशाला सर्वसामान्य माणसांनी सुद्धा सभ्य भाषेतच एकमेकांशी संवाद साधायला हवा. अशा प्रकारे शिव्या देणं चुकीचं आहे. पण सध्या भाजपाची ताकद आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने शिव्या देत आहेत. बबनराव लोणीकर माजी मंत्री आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत. अनेक वर्षे त्यांना सभागृहाचा अनुभव आहे. असं असताना आम्हाला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. कुणी शिव्या दिल्या म्हणून आपण देणं हे सुद्धा चुकीचंच आहे, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.

Devendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !

त्यावर अतुल भातखळकर यांनीही उत्तरात उद्धव ठाकरे आणि संंजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, मुळात या ऑडिओ क्लिपची सत्यता कुणीही पडताळून पाहिलेली नाही. त्यामुळे या क्लिपची सत्यता पडताळून पाहिलेली नसताना कुणावरही आरोप करणं चुकीचं आहे. पण मला एका गोष्टीची गंमत वाटते की समाजमाध्यमं संजय राऊतांच्या शिव्या त्यांनी आम्हाला दिलेल्या त्या दाखवतात वारंवार दाखवतात. त्यामुळे आताची ही व्हायरल होणारी क्लिप हा चर्चेचा विषय असू शकतो असं मला वाटत नाही. शिव्या कुणीच कुणाला देऊ नयेत ही भाजपाची भूमिका आहे. पण संजय राऊत आणि उबाठाची लोकं रोज येऊन वेगवेगळ्या भाषेत शिव्या घालतात. आमच्या नेत्यांबद्दल वाट्टेल ते शब्द वापरतात आणि आपण ते दाखवता हे लक्षात ठेवा.

उद्धव ठाकरे, राऊतांचं बोलणं म्हणजे तळीरामाने… 

कुणीच कुणाला शिव्या घालू नयेत. सभ्य भाषेचा वापर करावा. पण, उबाठाच्या लोकांनी हे बोलणं हाच मोठा जोक आहे. संजय राऊत तर रोज शिव्या घालतात. काल ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना काय बोलले. तु्म्ही ते दाखवलंत. ज्यावेळी मी सभ्य भाषेत एक ट्विट केलं होतं त्यावर ते काय बोलले होते असा सवाल करत उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी हे बोलावं म्हणजे तळीरामाने दारुबंदी विषयी बोलण्यासारखंच आहे असा खोचक टोला भातखळकर यांनी लगावला.

भाजपाच्या वैचारिकतेचा बुरखा फाटला – नाईक 

भातखळकरांच्या या टीकेवर नाईक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. संजय राऊतांचा बाणा हा ठाकरी बाणा आहे. ते शिव्या देताना कधी चोरून लपून देत नाहीत. परंतु, आता भाजप जो वैचारिकतेचा आव आणत आहे त्याचा बुरखा आज फाटला आहे. त्यामुळं ते आता आमच्यावर आरोप करत आहेत.

Tags

follow us