Download App

‘त्या’ अपघाताची चौकशी कराच; संभाजीराजेंनी सरकारला फटकारले!

Buldhana Bus Accident : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. बुलढाण्यात सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा फाट्यावर मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेवर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांनी सरकारवर तुफान टीका केली आहे. त्यानंतर या घटनेवर संभाजीराजे छत्रपती यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताबाबत ते म्हणाले, समृद्धी महामार्गावर घडलेली घटना अतिशय दुःखद आहे.

Buldhana Bus Accident : ‘ज्या मार्गाला शापित म्हणताय तो तर’.. राणांचा राऊतांवर पलटवार

हा महामार्ग अत्याधुनिक आहे आणि अशा ठिकाणी दुर्घटना होते याची चौकशी झालीच पाहिजे. महामार्ग बांधताना प्रोटोकॉल पाळले गेले आहेत का हे देखील तपासले गेले पाहिजे. जड वाहनांना आणि त्यांच्या चालकांना नियम आणि प्रोटोकॉल सांगणे आणि ते पाळले जात आहेत का हे पाहणे सु्द्धा तितकेच गरजेचे आहे. महामार्गावर वाहनांना वेग मर्यादा आणली पाहिजे असे स्पष्ट करत या सगळ्या घटनेची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली.

सरकारने सतर्क राहावे

पुणे शहरात सध्या घडत असलेल्या घटनांवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, पुणे शहर सुसंस्कृत आहे. मात्र येथे दिवसाही हल्ले होत आहेत. हा काही आपला महाराष्ट्र नाही. सरकारने सतर्क राहावे नाहीतर आपले राज्य देखील अन्य राज्यांसारखे होईल. राजकारणापेक्षा राज्यातील कायदा सुव्यवस्था जास्त महत्वाची आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

‘पंकजाताई, तुमच्या राजकारणासाठी मराठा समाजाच्या भावनांशी खेळू नका’; ‘सकल मराठा’ च्या नेत्याचे प्रत्युत्तर

किती काम केलं ते 2024 ला कळेलच

महाविकास आघाडीचं सरकार कोसळून राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आले. या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. या मुद्द्यावर ते म्हणाले, सरकारच्या कामाची पोहोच पावती त्यांनीच द्यावी. त्यांनी आता सरकारं आपल्या दारी सुरू केलं आहे. २०२४ ला कळेल कोण किती काम केलं असा सवाल उपस्थित करत आजही आपले राज्य अनेक बाबतीत मागे असल्याचे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Tags

follow us