Download App

अमरावती, बुलढाण्यात अवकाळीचे थैमान; शेती उद्धवस्त, विजेचा खेळखंडोबा

Unseasonal Rain in Buldhana : मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या अन्य भागाला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह अवेळी होत असलेल्या गारांच्या पावसाने शेतातील पिकांची धुळधाण केली आहे. पशुधनाचे मोठे नुकसान केले आहे. नद्या ओढ्यांना पूर आला आहे. असेच विदारक चित्र बुलढाणा जिल्ह्यात उभे राहिले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागात मागील 4 दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. भर उन्हाळ्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने नदी-नाल्यांना पूर येत आहे. बुलढाणा तालुक्यातील धाडजवळील बाणगंगा नदीला मोठा पूर आला असून, नदीच्या प्रवाहात जनावरे देखील वाहून गेली आहे.

Road Accident : बोलेरो-ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

डौलखेड येथे वीज पडून बैल ठार झाला. चिखली तालुक्यातही पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने उरल्या सुरल्या शेतीपिकांची मोठे नुकसान झाले. बुलढाणा तालुक्यातील धाड येथे सततच्या अवकाळी पावसामुळे बाणगंगा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील विद्युत तारा तुटल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला.

जवळपास तीन तासांपेक्षा अधिक वेळ मुसळधार पावसामुळे बाणगंगा नदीला पूर आल्याचे दिसत होते.जिल्हा नैसर्गिक आपत्ती कक्षाने दिलेल्या माहितीनुसार नांदुरा तालुक्यातील मौजे डोलखेड येथील अनिल विजयसिंह जाधव यांचा बैल वीज पडल्याने मृत्यूमुखी पडला.

अवकाळी पावसाने झोडपलं अन् होत्याच नव्हतं झालं…

अमरावतील मुसळधार, दवाखान्यात पाणी

अमरावती जिल्ह्याला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या काही रुग्ण असलेल्या वार्ड मध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रुग्णांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर मात्र सकाळी पूर्णपणे जिल्हा रुग्णालय परिसर स्वच्छ करण्यात आला. मात्र तरी देखील रुग्णालयात चिखलमय परिस्थिती झाली आहे.

Tags

follow us