Road Accident : बोलेरो-ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Road Accident : बोलेरो-ट्रॅक्टर-ट्रॉलीचा भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू

Road Accident : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh)आझमगड (Azamgarh)जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. पूर्वांचल द्रुतगती मार्गावर (Purvanchal Expressway) ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor trolley)आणि बोलेरोची (Bolero) धडक झाली आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती नाजूक आहे

Market Committee Election : आजही बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी अन् निकालही जाहीर होणार

मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊहून येणारी बोलेरो शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पूर्वांचल एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकली. या अपघातात बोलेरोमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तेथे आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथून त्यांना वाराणसीला रेफर करण्यात आले.

एएसपी सिटी शैलेंद्र लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, लखनऊहून गाझीपूरला जाणारी बोलेरो शनिवारी रात्री 11.30 वाजता पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरील अहरौला पोलीस स्टेशन हद्दीतील खडरामपूर गावाजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकली. या अपघातात बोलेरोमधील तीन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला.

तर एक महिला किरण गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथून त्यांना वाराणसीला रेफर करण्यात आले. हे सर्व देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. या घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube