Download App

‘कोरोनात घरात बसले, आता विदर्भात मतांची भीक मागतात’; राणांचा ठाकरेंवर घणाघात

Ravi Rana criticized Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष सावध झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भाजप नेतेही आक्रमक झाले असून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. आमदार रवी राणा यांनी आज उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेताहेत, बंडावर उद्धव ठाकरेंची टीकेची झोड…

राणा म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भात तोंड दाखवलं नाही. कोरोनाच्या काळात ते कधी मंत्रालयात गेले नाहीत. कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. आज मात्र पावसाळ्यातील बेडकांसारखे बाहेर निघाले आहेत. विदर्भाचा अमरावती जिल्ह्याचा दौरा करत आहेत. सगळ्या लोकांना हे माहिती आहे की राज्यात कोरोनाचे संकट असताना हे घरात बसले होते. आता मात्र विदर्भात येऊन मतांची भीक मागत आहेत आणि लोकांची दिशाभूल करत आहेत.

उद्धव साहेब एक लक्षात ठेवा जो मुख्यमंत्री असताना काही करू शकला नाही. आता तर तुमचे 40 आमदारही गेले आहेत. सत्ता गेली. पार्टी गेली. कशामुळे तर हनुमान चालिसेचा विरोध करून तुम्ही एका आमदार-खासदाराला जेलमध्ये टाकलं. म्हणून जो प्रभू रामाचा नाही, हनुमंताचा नाही तो कोणत्याच कामाचा नाही. त्यामुळे विदर्भात येऊन तुम्ही कितीही बकाला मारल्या तरी विदर्भाची जनता तुम्हाला चांगलीच ओळखून आहे. तुम्ही काय आहात तर पावसाळी बेडूक आहात, अशा शब्दांत आ. राणा यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

एका रात्रीत बदललं नगर जिल्ह्याचं राजकारण; अजितदादांची शरद पवारांवर मात

Tags

follow us