एका रात्रीत बदललं नगर जिल्ह्याचं राजकारण; अजितदादांची शरद पवारांवर मात

एका रात्रीत बदललं नगर जिल्ह्याचं राजकारण; अजितदादांची शरद पवारांवर मात

अहमदनगर : जिल्ह्याचं राजकारण एका रात्रीतच बदलल्याचं चित्र आहे. कालपर्यंत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाजूने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (NCP) 6 पैकी 4 आमदार होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे निलेश लंके आणि संग्राम जगताप असे आमदार होते. मात्र शनिवारच्या एका रात्रीत दोन आमदार अजित पवार यांच्या गोटात दाखल झाल्याने शरद पवार यांच्याकडे आता 2 तर अजितदादांकडे 4 आमदार झाले आहेत. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत पुतण्याने काकांवर मात केली आहे, असं म्हंटलं जात आहे. (Ahmednagar ncp mla Ashutosh Kale and Kiran Lahamate support to Ajit Pawar camp)

अजित पवार यांच्या बंडाच्या दिवशी शपथविधीवेळी पारनेरचे आमदार निलेश लंके, शहरचे आमदार संग्राम जगताप आणि किरण लहामटे उपस्थित होते. मात्र दुसऱ्याच दिवशी शरद पवार आपले दैवत असल्याचं म्हणतं लहामटे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांच्या बाजूने उभे राहिले. तर लंके आणि जगताप हे अजितदादांच्या बाजूने कायम राहिले. प्राजक्त तनपुरे, रोहित पवार यांनीही शरद पवार यांच्याबाजूनेच आपला कौल दिला. कोपरगांवचे आमदार आशुतोष काळे यांचे मात्र काहीच समजत नव्हते. त्यामुळे ते शरद पवार यांच्या बाजूनेच असावे असा अंदाज वर्तविला जाऊ लागला.

शिंदेंची उपयुक्तता संपली; मुख्यमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागेल! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

अखेरीस आशुतोष काळे सुद्धा अजित पवार यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत. आमदार काळे यांनी थेट परदेशात अॅफेडेव्हीट पाठवत अजित पवार यांना पाठिंबा दिल्याचे म्हटले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार काळे यांचे सासरे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यांनी अजितदादांची भेट का घेतली याची फारशी माहिती त्यावेळी समोर आली नव्हती. आता मात्र, घुले पवार भेटीचे कनेक्शनही आमदार काळे यांच्या पाठिंब्याला जोडले जात आहे.

आमदार लहामटे यांची पलटी :

शरद पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदार डॉ. किरण लहामटे यांनीही दोन दिवसांतच पलटी मारली आहे. लहामटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला असल्याची माहिती आहे. याबाबत आमदार लहामटे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे. मात्र सध्या अकोले तालुक्यात सुरु असलेल्या चर्चा पाहता लहामटे यांनी अजित दादांच्या गटाला साथ देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे.

मतदान कोणाला ही द्या, सरकार आमचंच येणार; ठाकरेंचा भाजपला टोला

किरण लहामटे हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचे आमदार आहे. 2019 साली त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा पराभव केला होता. ते सुरुवातीपासूनच अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. मात्र अकोला मतदारसंघात शरद पवारांना माननारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर हे अजितदादा गटाचे मानले जातात. आपल्या मतदारसंघातील जनमानस आणि स्थानिक राजकारण बघता लहामटे यांनी शरद पवारांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते.

मात्र आता त्यांनी अजित पवार यांची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. लहामटे आणि अजितदादा यांच्यात अहमदनगरमधील एका राष्ट्रवादीच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्याने मध्यस्थी केल्याची चर्चा आहे. हा नेता मागील 3 दिवसांपासून अकोले येथे ठाण मांडून बसला होता. या 3 दिवसात अजितदादा व लहामटेंमध्ये संपर्क करुन देत मध्यस्थाची भूमिका बजावत होता. अखेर शनिवारी मध्यरात्रीच रात्री लहामटे आणि हा नेता मुंबईत अजितदादांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी अजितदादांना पाठिंबा जाहीर केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube