शिंदेंची उपयुक्तता संपली; मुख्यमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागेल! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

शिंदेंची उपयुक्तता संपली; मुख्यमंत्रीपदी अजितदादांची वर्णी लागेल! पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Prithviraj Chavan मुंबई : विधानसभा अध्यक्षांना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या केसवर 10 ऑगस्टपूर्वी निकाल द्यावा लागेल. कदाचित भाजपनं (BJP) हे शिंदेंनी सांगितलंही असावं. तसंच आता शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकांना सामोरे जावं असं भाजपलाही वाटत नाही. त्यांची उपयुक्तता आता संपली आहे. त्यांचा प्रभाव फक्त ठाण्यापुरता आणि नकारात्मकता जास्त आहे. त्यामुळे भाजप आता शिंदेंऐवजी अजितदादांना मुख्यमंत्रीपदाची संधी देईल, असा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. (Ajit Pawar will be a chief minister replace by Eknath Shinde said Prithviraj chavan)

‘लोकसत्ता’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. ते पुढे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी तुटत नाही तोपर्यंत कोणत्याच निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत भाजपामध्ये नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू होते. शरद पवार यांचा अचानक आलेला राजीनामा, सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी वर्णी अशा अनेक गोष्टी राष्ट्रवादीमध्ये घडत होत्या. त्यातून काहीतरी घडेल अशी चिन्हे दिसत होती. या संघर्षादरम्यान, वाटाघाटी आणि अन्य बाबतीत अजित पवार थेट अमित शहांबरोबर चर्चा करत होते. प्रफुल्ल पटेल यासाठी मध्यस्थी करत होते.

यवतमाळ शून्यावर पण, येथूनच मिळणार पहिला आमदार; सावंतांचा ठाकरेंना शब्द

अजित पवार यांचं पहिल्यापासून म्हणणं होतं की मला मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. मला जर मुख्यमंत्री केलं तर राष्ट्रवादीचे सगळे आमदार बरोबर येतील. त्यानंतर आम्ही तिघे मिळून तुमच्या हातात महाराष्ट्र देतो, असे त्यांनी गृहमंत्री अमित शाह यांना सांगितले होते. दुसऱ्या बाजूला भाजपचे जे जुने नेते होते ते अजित पवारांना स्वीकारायला आजिबात तयार नव्हते. आरएसएस तसेच नितीन गडकरींचा गटही यासाठी तयार नव्हता. नाराजी होती. पण ते केलं गेलं.

‘कोरोनात घरात बसले, आता विदर्भात मतांची भीक मागतात’; राणांचा ठाकरेंवर घणाघात

आता भाजपमध्ये त्यांना मुख्यमंत्री करण्याबाबत काय ठरले असेल तर त्याचे त्या पक्षात काय परिणाम होतील, संघ फक्त पाहात राहील का, आणि शिंदे गटाचे काय होईल, असे प्रश्न आहेत, मात्र आगामी दोन महिन्यांत काही तरी घडेल, असे मला वाटते. शरद पवारांनी अजित पवारांना भाजपकडे पाठविले असावे, या शंकेत तथ्य नाही. मी कराडला पवारांचा जोश बघितला. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा आहे, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube