पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेताहेत, बंडावर उद्धव ठाकरेंची टीकेची झोड…

पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेताहेत, बंडावर उद्धव ठाकरेंची टीकेची झोड…

पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवून नेत असल्याची टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय. दरम्यान, आधी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यानंतर आता राष्ट्रवादीतही अजित पवारांना बंड केल्याने पक्ष पळवून नेल्याचं म्हणत ठाकरेंनी दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. वाशिममध्ये पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे.

शिंदे गटाचा विरोध धुडकावला, अजितदादाच अर्थमंत्री? सरकारी ‘जीआर’मध्ये भलतीच खेळी!

उद्धव ठाकरे म्हणाले, पोहरादेवीचं दर्शन घ्यायंचय हे मागील अनेक दिवसांपासून मनात होतं. त्यामुळे आपल्या दौऱ्याची सुरुवातच पोहरादेवी पवित्र तीर्थक्षेत्रापासून करु, त्यामुळे आज पोहरादेवीचं दर्शन घेऊन सुरुवात केली आहे. या दौऱ्यात जाहीर सभांऐवजी मी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची बंपर भरती, परीक्षा नाही, थेट मुलाखत; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

तसेच महाराष्ट्राला फोडाफोडी राजकारण नवीन नाही, पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेत आहेत. तरीदेखील आम्हाला जनतेतून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. विरोधकांचा फोडाफोडीचा पायंडा महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी वाईट असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बाळासाहेबांची शेवटची इच्छा कोणती? गडकरी म्हणाले, राज-उद्धव यांनी…

ठाकरे गटात अनेक नवनवी कार्यकर्त्यांना संधी मिळत आहेत. आधी या कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती. अनेक कार्यकर्त्यांचं पक्षात इनकमिंग सुरु असून शिवसेनेत नवीन चेहरे येत आहेत. यावेळी बोलताना त्यांनी शेतीच्या पिकाचं उदाहरण देत विरोधकांवर टोलेबोजी केलीय. ते म्हणाले, शेती ही आमची, तुम्ही पीक कापलं असेल पण शेती आमची आहे त्यामुळे पीक नवीन येणार, जे पीक तुम्ही कापणी म्हणून नेलं त्याला हमी भाव मिळतो का बघा? या शब्दांत त्यांनी विरोधकांना टोले लगावले आहेत.

दरम्यान, येत्या काही दिवसांत विधानसभा अध्यक्षांना अपात्र आमदारांबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यांनी निर्णय नाही घेतला तर सर्वोच्च न्यायालय आहेच, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांनी दिला आहे. तसेच भाजप आता काहीच बोलण्याच्या लायकीचं राहिलेलं नसून दुसऱ्यांवर दोषारोप करण्यापेक्षा घरात घुसून घेणाऱ्यांचा सांभाळ करावा, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube