बाळासाहेबांची शेवटची इच्छा कोणती? गडकरी म्हणाले, राज-उद्धव यांनी…

बाळासाहेबांची शेवटची इच्छा कोणती? गडकरी म्हणाले,  राज-उद्धव यांनी…

Nitin Gadkari : काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनपेक्षित घटना घडत आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे युती होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, खुद्द राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. त्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक मोठा दावा केला आहे.

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात गडकरी यांनी हा दावा केल्याने मनसे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का, असा प्रश्न पुन्हा विचारला जाऊ लागला आहे. येत्या 9 तारखेला हा भाग रिलीज होणार आहे. या भागाचे काही प्रोमो समोर आले आहेत. अशाच एका प्रोमोमध्ये गडकरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिल्याचे सांगताना दिसत आहेत.

सभापतीनींच पक्षांतर केले, त्यांच्या पक्षांतर बंदीची सुनावणी कुणासमोर चालणार?

काय म्हणाले गडकरी ?

बाळासाहेबांचे माझ्यावर आणि माझे बाळासाहेबांवर प्रेम होते. ज्यावेळी बाळासाहेब शेवटच्या दिवसांत होते तेव्हा मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सर्वांना बाहेर जायला सांगितलं. त्यावेळी त्यांनी मला राज आणि उद्धव या दोघांना एकत्र करण्यास सांगितलं. राजकारण एका बाजूला पण कुटुंब म्हणून एकत्र राहिले तर ताकद वाढते. मात्र, बाळासाहेबांची ही इच्छा आजही अपूर्ण राहिल्याचे गडकरी म्हणाले.

यानंतर गडकरी यांनी राजकारणातील सद्य परिस्थितीवरही भाष्य केले. गडकरी यांनी बाळासाहेबांची शेवटची इच्छा अपूर्ण राहिल्याचे जाहीरपणे सांगितले. तसेही कार्यकर्त्यांना नेहमीच वाटत आले आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावेत. पण, अजूनही तसे घडलेले नाही. आता पु्न्हा एकदा गडकरी यांनी हा मुद्दा पुढे आणला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता नितीन गडकरी स्वतः प्रयत्न करणार का? ठाकरे गट आणि मनसे नेते काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रफुल्ल पटेल यांनी रडकुंडीला येऊन शरद पवारांना काय सांगितलं होतं?

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube