नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची बंपर भरती, परीक्षा नाही, थेट मुलाखत; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची बंपर भरती, परीक्षा नाही, थेट मुलाखत; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Teacher Recruitment : नवी मुंबई महानगरपालिकेत (Navi Mumbai Municipal Corporation) शिक्षक पदांसाठी भरती (Teacher Recruitment) सुरू झाली असून या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या शिक्षक पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांची मुलाखत 10 जुलै 2023 रोजी दुपारी बारा होणार आहे. ही भरती निव्वळ तात्पुरत्या स्वरुपासाठी तासिका तत्वार आहे. या भरतीचे नोटिफिकेशन प्रसिद्ध झाले असून एकूण पदे, पदांचा तपशील, पात्रता, वयोमर्यादा या बाबी जाणून घेण्यासाठी नोटिफिकेशन आवश्य वाचा. दरम्यान, या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. (Recruitment of teachers under Navi Mumbai Municipal Corporation last date 10th July)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

आवश्यक कागदपत्रे छाननीच्या वेळी मूळ गुणपत्रिका व मूळ प्रमाणपत्रे तपासण्यात येतील. छाननी नंतर निकाल www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

पदाचे नाव – प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक

एकूण रिक्त पदे: 183

पदांचा तपशील –
प्राथमिक शिक्षक – 123
माध्यमिक शिक्षक – 60

शैक्षणिक पात्रता –
प्राथमिक शिक्षक : 12वी पास + D.Ed + TET/CTET.
माध्यमिक शिक्षक : 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी + B.Ed.
संगणकाची एमएससीआयटी परीक्षा उत्तार्ण असणे आवश्यक

आढळराव शरद पवारांचे दार ठोठावतायत पण मी असताना…; कोल्हेंचा मोठा दावा 

वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय – 5 वर्षांची सूट.

अर्ज फी – कोणतेही अर्ज शुल्क नाही.

नोकरीचे ठिकाण – नवी मुंबई.

मुलाखतची तारीख – 10 जुलै 2023 दुपारी 12 वाजता.

मुलाखतीचे ठिकाण –
नवी मुंबई महानगरपालिका, मुख्यालय तिसरा मजला, ज्ञान केंद्र, सीबीडी बेलापूर.

निवड पद्धत –
TET/CTET परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. TET/CTET उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास एच.एस.सी.डी.एड च्या उमेदवारांची निवड करण्यात येईल.

अटी –
पोस्ट, कुरिअर किंवा ई-मेलद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
बोनस, सानुग्रह अनुदान मिळणार नाही
मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केल्या जाणार नाही.
अर्ज अर्धवट, कागदपत्रे जोडलेली नसल्यास बाद करण्यात येईल.

अर्ज कोठे करावा? –
मा. उप आयुक्त (शिक्षण), नमुंमपा

प्राथमिक शिक्षक भरतीसंदर्भात जाहिरात –https://drive.google.com/file/d/1SpyBpZqvGdRCcRYIVclfC1Fq0EGXBAGl/view

माध्यमिक शिक्षक भरतीसंदर्भात जाहिरात – https://drive.google.com/file/d/1RgNqykma84PX3lEXjx8pvV0VYUk9KFPl/view

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या : https://www.nmmc.gov.in/navimumbai/

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube