Download App

Devendra Fadnavis : ऑनलाइन फ्रॉड हाणून पाडणार; फडणवीसांनी सांगितलं सरकारचं प्लॅनिंग !

Devendra Fadnavis : महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महादेव अ‍ॅपसारखीच आणखीही अनेक अ‍ॅप आहेत ज्यावर हा धंदा सुरू आहे. या अ‍ॅपसंदर्भात सरकारकडे काही धोरण आहे का, या प्रकारांवर कारवाई करून लोकांची फसवणूक कशी टाळता येईल, केंद्र सरकार यावर कायदा करील तेव्हा करील पण राज्यातील लोकांची फसवणूक होणार नाही यासाठी राज्य सरकार काही करणार आहे का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला. या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सविस्तर उत्तर देत सरकारी पातळीवर काय कार्यवाही सुरू आहे याची माहिती (Maharashtra Winter Session) विधानसभेत दिली.

फडणवीस म्हणाले, हा विषय फसवणुकीचा नाही. यात लोकं खेळतात, पैसे कमावतात, गमावतात. जो जुगार आपण फिजीकली बंद केला तो या लोकांनी ऑनलाइन सुरू केला आहे. एखादी गोष्ट जर सायबर स्पेसमध्ये असेल तर ते आपल्या लक्षात येऊ शकतं. पण, या लोकांनी सिस्टिमच अशी तयार केली होती की हे लोक लवकर सापडले नाहीत. ही सगळी यंत्रणा व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रॅम चॅनलच्या माध्यमातून चालायची आपला सायबर सेल हे चॅनेल मॉनिटर करू शकत नाही. त्याची परवानगीही आपल्याला मिळत नाही.

Mahadev Betting App : मोठी बातमी! ‘महादेव अ‍ॅप’च्या मालकाला दुबईत अटक; भारतात आणणार

टेलिग्रॅम तर युएस बेस्ड कंपनी आहे ही लोकं आपल्याला तिथं एन्ट्री सुद्धा देत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे अशी एखादी तक्रार येते किंवा त्याची व्याप्ती वाढते त्यावेळेसच या गोष्टी आपल्या लक्षात येतात. त्यामुळे केंद्र सरकारचा आता असा विचार सुरू आहे की अशा पद्धतीने ज्या कंपन्या डेटा देत नाहीत त्यांच्यासाठी एखादा कायदा आणून डेटा शेअरिंग करण बंधनकारक केलं पाहिजे अशा प्रकारचा डेटा संबंधित जो कायदा चालला आहे तो यासाठीच आहे.

आता तर असंही लक्षात आलं आहे की ड्रग्सच्या संदर्भात इन्स्टाग्रामवर ऑर्डर दिली जाते. ऑर्डर प्लेस करण्यासाठी काही खास इशारे आहेत. त्यानंतर ऑनलाइन पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून पैसेही घेतले जातात. नंतर कुरिअरद्वारे माल पोहोच केला जातो. आता या गोष्टी जसजशा लक्षात येत आहेत तशी कारवाई केली जात आहे. नवनवीन पद्धती शोधल्या जात आहेत. पण एक सांगतो या सगळ्या पद्धती आपण निश्चितपणे हाणून पाडू, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

Tags

follow us