Mla Ravi Rana : आमदार रवी राणा(Ravi Rana) राजकीय नेत्यांवर टीका-टीप्पण्या करुन नेहमीच चर्चेत असतात, अशातच आता आणखी एका नव्या वक्तव्याने रवी राणा चर्चेत आले आहेत. अमरावतीमधील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखेडे(Balwant Wankhede) यांच्यावर टीका करताना रवी राणा यांची जीभ घसरली आहे. दर्यापूरचा आमदार तिवसा मतदारसंघाच्या आमदारांच्या चप्पला उचलत असल्याचं वादग्रस्त वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. अमरावतीत आयोजित दहिहंडी कार्यक्रमादरम्यान, त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
नगरमधील दिल्लीगेट ते पत्रकार चौक रस्त्याचे नामकरण छत्रपती चौथे शिवाजी महाराज मार्ग
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. आगामी अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असल्याचं बोललं जात आहेत, आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या लोकसभा मतदारसंघात विद्यामान खासदार आहेत. त्यावरुन रवी राणा यांनी वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, ‘या’ नेत्यांना मिळालं निमंत्रण; बैठकीत आरक्षणावर तोडगा निघणार?
पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, दर्यापूर मतदारसंघाचा आमदार तिवसा मतदार संघाच्या आमदाराच्या चपला उचलतो, आमदार कोणी बनवलं, या जनतेने बनवलं अन् चपला कोणाच्या उचलतायं, नेत्याच्या तर खुर्चीला लाथ मारून काम करण्याची ताकद असली पाहिजे. त्याला म्हणतात मर्द आमदार, अशी सडकून टीका आमदार रवी राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांची चाचपणी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं दिसून येत आहे. अशातच आता रवी राणा यांनी बळवंत वानखेडे यांच्यावर निशाणा साधल्याने त्यांचं हे वादग्रस्त विधान चर्चेत आलं आहे. अद्याप वानखेडे यांनी या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून वानखेडे रवी राणांच्या वक्तव्यावर काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.