Download App

ठाकरे विरुद्ध राणा : “परत निवडणुका लढवायच्या आहेत हे लक्षात ठेवा…” संजय राऊतांचा दाम्पत्याला इशारा

  • Written By: Last Updated:

अमरावती : शिवसेना (UTB) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळचा दौरा आटोपून ते रविवारी (9 जुलै) रात्री उशिरा अमरावतीमध्ये पोहचले. दरम्यान, ठाकरे अमरावतीमध्ये पोहचण्यापूर्वीच तिथलं राजकारण चांगलेच तापलेलं पाहायला मिळालं. ठाकरे यांच्या अमरावती दौऱ्यानिमित्त ठाकरे विरुद्ध राणा यांच्यातील वादाला नव्याने फोडणी मिळाली. (Shivsena Ubt Chief Uddhav Thackeray vs MP Navneet Rana and MLA Ravi Rana)

उद्धव ठाकरे अमरावतीत येण्यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याकडून शहरात सामूहिक हनुमान चालिसाचं आयोजन करण्यात आलं आहे. याचे बॅनर राणा दाम्पत्याकडून लावण्यात आले. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताच्या बॅनरखाली हे बॅनर लावण्यात आले होते. इतक्यात दोन्ही बाजूंच्या समर्थकांनी एकमेकांचे बॅनर फाडून टाकले.  त्यामुळे काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

काय म्हणाले संजय राऊत?

दरम्यान, ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर राणा समर्थकांनी फाडल्याने खासदार संजय राऊत यांनी राणा यांचावर निशाणा साधला. “या राणा बाई परत लोकसभेत जातील याची खात्री नाही, यांना बजरंगबली धडा शिकवणार: असा टोला यावेळी लगावला.

राऊत म्हणाले, हनुमान चालीसाचे पठण आता त्यांनी मुंबईत येऊन फुटीर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जो हिंदुत्वाला विरोध करत होता त्यांच्यासमोर करावे. आज ते बॅनर फाडत आहेत, त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. त्यांच्या पाठीमागे सत्ता आणि पोलीस आहेत. ही गुंडगिरी आम्हाला शिकवू नये.

अमरावतीमध्ये परत त्यांना निवडणुका लढायच्या आहेत, हे यांनी लक्षात ठेवावे. जर निवडणूक लढवायच्या नसतील तर मग यांनी पुढे यावं. कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीचे राजकारण केल्यामुळे त्यांना बजरंगबलीने चांगलाच धडा शिकवला. तसाच धडा बजरंगबली आता या राणा बाईंना शिकवेल.

राणा यांच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलीसांनी नोटिसा बजावल्या आहेत. 10 जुलैला उद्धव ठाकरे यांचा अमरावती दौरा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमादरम्यान आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही असे कोणतेही गैरकृत्य करु नये. गैरकृत्य केल्यास आपणाविरुद्ध प्रचलित कायद्यान्वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. याकरीता आपणास नोटीस देण्यात येत आहे, असे यात सांगण्यात आले आहे.

 

 

Tags

follow us