भाजप अन् ठाकरेंकडून घराणेशाहीला बूस्टर; आमदार पत्नी, पूत्र, बहिणीला उमेदवारी, कडूंनी संधी साधली

भाजप आणि ठाकरेंकडून टाकण्यात आलेल्या या डावामुळे निष्ठावंत आणि इच्छूक कार्यकर्त्यांमध्ये कामालीची नाराजी व्यक्त केली जात आहे. 

नगरपरिषद निवडणूक : भाजप अन् ठाकरेंकडून घराणेशाहीला बूस्टर; आमदार पत्नी, पूत्र, बहिणीला उमेदवारी

नगरपरिषद निवडणूक : भाजप अन् ठाकरेंकडून घराणेशाहीला बूस्टर; आमदार पत्नी, पूत्र, बहिणीला उमेदवारी

Nagar Parishad Election 2025 : येत्या 2 डिसेंबरला राज्यातील विविध नगरपरिषदांसाठी मतदान पार पडणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचे चित्र आहे. मात्र, घराणेशाहीवरून काँग्रेस आणि अन्य पक्षांवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत आमदारांचा मुलगा, पत्नी आणि बहिणीला उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे घराणेशाहीवरून विरोधकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप अन् शिवसेनेकडूनच घराणेशाहीच्या व्याख्येला सुरूंग लावल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांचा बिगुल कधीपासून? जाणून घ्या निवडणुकीची संभाव्य तारीख

नगराध्यक्षपद घरातच ठेवण्याची छुपी खेळी

गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) रखडल्या होत्या. मात्र, आता 2 डिसेंबर रोजी नगराध्यक्षपदासाठी मतदान पार पडणार आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींची निवडणूक चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. भाजप आणि उद्धवसेनेच्या आमदारांनी यंदा नातेवाईकांनाच उमेदवारी मिळवून देण्याच बाजी मारली आहे. यामुळे नगराध्यक्षपद घरातच ठेवण्याची ही छुपी खेळी असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र, भाजप आणि ठाकरेंकडून टाकण्यात आलेल्या या डावामुळे निष्ठावंत आणि इच्छूक कार्यकर्त्यांमध्ये कामालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.

फलटणमध्ये बिग फाईट : रणजितसिंह -रामराजे पुन्हा एकदा भिडणार !

घराणेशाहीत कुणा-कुणाला मिळाली संधी

अमरावती जिल्ह्यातील नगराध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारीमध्ये दर्यापूर नगराध्यक्षपदासाठी नगरपरिषदेसाठी भाजपने नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी दिली आहे. नलिनी या अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी आहेत. तर, दुसरीकडे दर्यापूर मतदारसंघाचे उद्धवसेनेचे आमदार गजानन लवटे यांनी त्यांचे चिरंजीव यश लवटे यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावत अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. याशिवाय धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी धामणगाव नगरपरिषद् नगराध्यपदासाठी भाजपने अडसड यांची बहीण अर्चना रोठे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

दर्यापूरमध्ये जाऊ विरूद्ध जाऊ मैदानात

दर्यापूर नगरपरिषद नगरध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असून, यंदा नगराध्यक्षपदावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार लढत होण्याचे चित्र आहे. याठिकाणी भाजपच्या नलिनी भारसाकळे आणि मंदाकिनी भारसाकळे या दोघींमध्ये चुरस होणार आहे. नलिनी आणि मंदाकिनी या नात्यात एकमेकींच्या जावा लागतात. त्यामुळे ही लढत जाऊ विरूद्ध जाऊ अशी रंगणार आहे.

हायहोल्टेज ड्रामा! राजन पाटलांनी ट्रॅप लावला, रस्ते अडवले, पाठलाग केला; उज्वला थिटेंचा पहाटे पोलिस बंदोबस्तात अर्ज…

अशा लोकांना जनतेने धडा शिकवावा – बच्चू कडू

अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत आमदाराचे पुत्र, पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने घरानेशाहीला बळ मिळाले आणि अनेक स्वप्नभंग झाले, अशी टीका होत आहे. यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायची आणि दुसरीकडे स्वतःच्या बायका, बहिणी समोर करायच्या असा फंडा सूरू आहे. राजकारण आपल्या घरीच आपल्याच बाजूने असायला पाहिजे अशा लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे असा प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे.

Exit mobile version