Nagpur Crime : रेल्वेतून सोन्याची तस्करी करणारे दोघं रेल्वे पोलिसांच्या (Railway Police)जाळ्यात अडकले आहेत. रेल्वे पोलिसांनी त्यांच्याकडून एक, दोन नव्हे तर तब्बल साडेपाच कोटी रुपयांची नऊ किलो सोन्याची बिस्किटं (Gold Biscuits)जप्त केली आहेत. नागपूर स्टेशनवर (Nagpur Railway Station)रेल्वे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. या कारवाईमुळे सोने तस्करी (Gold Smuggling)करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
गरबा उत्सवाच्या स्वस्तातील पासचा मोह आला अंगलट, तरुणाला पाच लाख रुपयांचा गंडा
मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी पुण्याकडे (Pune)जाणाऱ्या हावडा-पुणे आझाद हिंद एक्सप्रेसमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याचे गुप्त माहितीदाराने सांगितले. त्या माहितीच्या आधारे रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी सूत्र फिरवून सापळा रचला. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे पोलिसांनी कोचमधील सीटवर बसलेल्या दोघांना संशयावरुन ताब्यात घेतले.
भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे अन् अजितदादांनी सुरु केली तयारी; फडणवीसांच्या शिलेदाराची ‘कोंडी’
रेल्वे पोलिसांनी राहुल आणि बालूराम या दोघांच्या बॅगची तपासणी केली. त्यामध्ये साधारण साडेआठ ते नऊ किलो वजनीची सोन्याची बिस्कीटं दिसून आली. या बिस्किटांबद्दल त्या दोघांकडे विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे असलेल्या या सोन्याच्या बिस्किटांबद्दल उडवाऊडवीची उत्तरं देत असल्यामुळं त्या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे.
रेल्वे पोलिसांनी पुढच्या कारवाईसाठी त्या दोघांनाही डीआरआय कार्यालयामध्ये नेण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ते दोघेही सोन्याची तस्करी करत असल्याची शंका पोलिसांना आली. त्यानंतर त्यांची तपासणी केल्याने त्यांच्याकडे जवळपास साडेपाच कोटी रुपयांची सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत.
दोन दिवसांपूर्वीच तस्करी करणाऱ्यांना अटक केली असली तरी, पोलिसांना या तस्करीमध्ये अनेकजण सहभागी असल्याचा संशय होता, त्यामुळे रेल्वे पोलिसांनी याची माहिती गुप्त ठेवली. दोन दिवस तपासचक्र फिरवली, सोने तस्करीचं नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांनंतर रेल्वे पोलिसांनी याची माहिती माध्यमांना दिली आहे.
यावेळी रेल्वे पोलीस निरीक्षक मीना, हेडकॉन्स्टेबल मदन लाल, कॉन्स्टेबल मोहन लाल दिवांगन, अमोल चहाजगुणे, सचिन सिरसाट, उपनिरीक्षक मुकेश राठोड, जसवीर सिंग आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. रेल्वे पोलिसांची पुढील चौकशी सुरु आहे.