भाजपच्या बालेकिल्ल्यात शिंदे अन् अजितदादांनी सुरु केली तयारी; फडणवीसांच्या शिलेदाराची ‘कोंडी’
मुंबई : विधानपरिषदेचा कोकण पदवीधर मतदासंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. 1988 पासून 2012 सालचा एक अपवाद वगळता आजपर्यंत भाजपने मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला आहे. सध्या भाजपचे निरंजन डावखरे या मतदारसंघातून आमदार आहेत. मात्र आता याच मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेही दावा केला आहे, सोबतच मतदार नोंदणी मोहिमही हाती घेतली आहे.
याशिवाय अजितदादांच्या गटातून माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. शिंदे गट आणि अजित पवार गट या दोन्ही मित्र पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता कमालीची अस्वस्था पसरली आहे. (Konkan Graduate Constituency Shiv Sena and NCP have started voter registration)
Chhagan Bhujbal : मनोज जरांजे पाटील कुणाचं खातोय…; छगन भुजबळांचा थेट सवाल
ठाण्यात भाजप दावा करु शकतो तर आपण कोकणवर दावा करु :
ठाणे लोकसभेसाठी सध्या भाजप आग्रही आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. याबाबत शिंदे गटाने एक बैठक घेतली होती. यानंतर शिंदेंकडून कोकण पदवीधरवर दावा केला जात आहे. भाजप जर ठाणे लोकसभेवर दावा करत असेल तर आपण कोकण पदवीधर मतदार संघावर दावा का करू शकत नाही, असा सूर या बैठकीत निघाला होता. त्यावर ही बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले होते.
अजित पवार गटाकडून तयारीही सुरु :
दरम्यान, ही निवडणूक लढण्याची तयारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही सुरू केली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. त्यांनीच राष्ट्रवादीकडून मागील निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांना 14 हजार मते मिळाली होती. त्यांनी मतदार नोंदणी सुरू केल्याने ते यंदाची निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मराठ्यांना उचकवायची सुपारी ते फेसबुक पेज बंद पाडलं : जरांगेंचे शिंदे सरकारवर पाच मोठे आरोप
भाजपचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने एकदाच भेदला :
कोकण पदवीधन मतदारसंघाची स्थापना 1988 साली झाली. त्यावेळी वसंत पटवर्धन यांच्या रुपाने भाजपने भगवा फडविला. त्यानंतर 1994 आणि 2000 मध्ये डॉ. अशोक मोडक यांनी भाजपच्या तिकीटावर सलग दोनवेळा विजय मिळविला. 2006 मध्ये संजय केळकर यांच्या रुपाने भाजपने मतदारसंघ कायम राखला. पण 2012 मध्ये निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीतून निवडणूक लढवत भाजपच्या संजय केळकर यांचा 5 हजारांच्या मताधिक्क्याने पराभव केला. त्यानंतर 2018 च्या निवडणुकीपूर्वी डावखरे यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीने नजीब मुल्ला यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना मैदानात उतरविले. फारशी तयारी नसतानाही मुल्ला यांनी 14 हजार मते घेतली होती. आता पुन्हा एकदा मुल्ला यांनी तयारी सुरु केली आहे.