गरबा उत्सवाच्या स्वस्तातील पासचा मोह आला अंगलट, तरुणाला पाच लाख रुपयांचा गंडा
मुंबई: लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या कार्यक्रमाच्या सवलतीत पास देऊ असं सांगून एका व्यक्तीने 20 वर्षीय उद्योजकाला पाच लाख रुपयांचा गंडा (5 lakh fraud) घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
IND vs PAK: पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीकडून मोठी चूक; सोडावे लागले मैदान
मिळालेल्या माहितीनुसार, चिकूवाडी, बोरिवली येथे फाल्गुनी पाठकचा गरबा शो होणार आहे. या कार्यक्रमाच्या कांदिवली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराला सवलतीचे पास हवे होते. कारण, एका पासची किंमत 4,500 रुपये आहे. एवढी रक्कम त्यांना देणं शक्य नव्हतं. त्यानंतर तक्रारदाराच्या एका मित्राने सवलतीत पास मिळतील असं सांगून विशाल नामक इसमाला सवलतीत पास मिळतील का, अशी विचारणा केली. विशालने आपण अधिकृत व्यापारी असल्याचं सांगून पास मिळतील असं सांगितलं.
विशालेने आपण प्रत्येकी 3,300 रुपयांना सवलतीचे पास देऊ, असं सांगितलं. त्यानंतर तक्रारदार आणि त्याच्या मित्राने तब्बल 156 पास खरेदी केल्या. याची एकूण किंमत 5.1 लाख रुपये होती.
विशालने तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना सांगितले की, आपला एक प्रतिनिधी न्यू लिंक रोडवर तुम्हाला भेटेल. त्याच्याकडे तुम्ही पासेसची रोख रक्कम जमा करा. रक्कम जमा केल्यानंतर पास घेण्यासाठी योगीनगर येथे भेटण्यास सांगितले. तरुणांनी विशालच्या प्रतिनिधीकडे पैसे दिले. मात्र त्यानंतर ते योगीनगरमध्ये पोहोचल्यावर विशालने त्यांना ज्या इमारतीत येण्यास सांगितले होते ती इमारत त्यांना सापडली नाही.
त्यांनी विशालसला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदार व त्याच्या मित्रांच्या लक्षात आले आणि त्यांनी एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीची शोध घेत आहेत.