IND vs PAK: पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीकडून मोठी चूक; सोडावे लागले मैदान

  • Written By: Published:
IND vs PAK: पाक विरुद्धच्या सामन्यात कोहलीकडून मोठी चूक; सोडावे लागले मैदान

IND vs PAK : आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानमध्ये (India Pakistan Match) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर महामुकाबला खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या महामुकाबल्यादरम्यान भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीकडून (Virat Kohli) एक मोठी चूक झाली. यामुळे त्याला सामन्याला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये मैदान सोडावे लागले. (Virat Kohli Jersey)

नेमकं काय झालं?

भारत-पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी नियमानुसार दोन्ही देशांचे खेळाडू मैदानात उभे राहिले आणि दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाले. यावेळी विराट कोहलीची जर्सी टीम इंडियाच्या इतर खेळाडूंपेक्षा वेगळी असल्याचे दिसून आले. कोहलीच्या जर्सीच्या खांद्यावर फक्त तीन पांढरे पट्टे होते. त्याच वेळी, इतर खेळाडूंच्या जर्सीवर खांद्याजवळ केशरी, पांढरा आणि हिरव्या रंगासह वर्ल्ड कपचा लोगोही होता. ही एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी भारतीय संघाची अधिकृत जर्सी आहे. तर, विराटच्या जर्सीवर केवळ तीन पांढरे पट्टे होते.

भारताने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी का निवडली? नाणेफेकीनंतर रोहितने सांगितले कारण

नाणेफेकीनंतर काही वेळाने कोहली चुकीची जर्सी घालून मैदानात आल्याचे समजले. ही चूक लक्षात येताच विराट मैदानाबाहेर गेला आणि जर्सी बदलून मैदानावर परतला. यादरम्यान इशान किशन कोहलीच्या जागी काहीकाळ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाच्या जर्सीमध्ये खांद्यावर तिरंगा आहे. मात्र, कोहली जुनी जर्सी घालून आल्याने त्याला मैदान सोडत थेट ड्रेसिंग रूम गाठावे लागले.

एकदिवसीय विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना 1992 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झाला होता. त्यानंतर दोन्ही संघ 7 वेळा आमनेसामने आले आहेत आणि प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे.

IND vs PAK : भारत-पाक सामन्यावर बहिष्कार! निषेधाच्या ट्विट्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

1992- सिडनी
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानचे संघ पहिल्यांदा आमनेसामने आले होते ते 1992 च्या विश्वचषकात सिडनीत. 4 मार्च 1992 रोजी झालेल्या सामन्यात भारताने 43 धावांनी विजय मिळवला होता.

1996- बंगलोर
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा सामना 1996 च्या स्पर्धेत बंगळुरू येथे झाला. 9 मार्च रोजी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव केला होता.

1999- मँचेस्टर
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना 1999 च्या विश्वचषकात 8 जून रोजी झाला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव केला.

…तर आम्ही पुन्हा सरन्यायाधीशांकडे जाऊ; नार्वेकरांना आदित्य ठाकरेंचा इशारा!

2003- सेंच्युरियन
2003 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान सेंच्युरियनमध्ये भिडले होते. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 29 धावांनी पराभव केला.

2011- मोहाली
2011 मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाचा चॅम्पियन बनला होता. या विश्वचषकात मोहालीमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला, ज्यामध्ये टीम इंडियाने 29 धावांनी विजय मिळवला.

2015- अॅडलेड
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तानची सहावी लढत अॅडलेडमध्ये झाली. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव केला.

World cup 2023 : भारत-पाक सामन्यापूर्वी शुभमन गिल ठरला ‘प्लेअर ऑफ द मंथ’

2019- मँटेस्टर
एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा आणि सातवा सामना मँचेस्टरमध्ये झाला. या सामन्यात टीम इंडियाने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला. एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध भारताचा हा सलग 7 वा विजय ठरला.

कसे आहेत दोन्ही देशांचे संघ

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube