भारताने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी का निवडली? नाणेफेकीनंतर रोहितने सांगितले कारण

भारताने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी का निवडली? नाणेफेकीनंतर रोहितने सांगितले कारण

IND vs PAK: विश्वचषकाच्या (World Cup 2023) हाय व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीदरम्यान कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचे कारण सांगितले. रोहित म्हणाला की, नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी अतिशय उत्कृष्ट आहे आणि दव हा एक मोठा फॅक्टर ठरू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

दव फॅक्टर प्रभावी ठरणार
दव मुळे नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला मदत मिळत नाही. चेंडू पुन्हा पुन्हा ओला होतो त्यामुळे गोलंदाजाला नीट पकड घेता येत नाही. अशा खेळपट्टीवर नंतर गोलंदाजीचा पर्याय कर्णधार निवडतात आणि त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या शानदार सामन्यासाठी रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला आहे. पाकिस्तान संघात कोणताही बदल झालेला नाही.

खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा
नाणेफेक दरम्यान रोहित शर्मा म्हणाला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू. स्टेडियमचे वातावरण अतिशय अद्भुत आहे. आज अनेक खेळाडूंना विलक्षण अनुभव येणार आहेत. अहमदाबादची खेळपट्टी खूप चांगली आहे. येथील दव फॅक्टर लक्षात घेऊन आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला सर्व खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे आणि मला माहित आहे की सर्व खेळाडू यासाठी प्रयत्न करतील.

Priya Bapat: पहिल्यांदाच दिसला प्रिया बापटचा असा अवतार अन् चर्चा सुरु…

शुभमन गिल स्पेशल खेळाडू
यावेळी रोहित शर्माने प्लेईंग इलेव्हनमधील बदलाबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, शुभमन गिलचे पुनरागमन झाले असून तो इशान किशनच्या जागी संघात आला आहे. ईशान संघात नसणे हे थोडे दुर्दैवी आहे. शुभमन गिल हा गेल्या एक वर्षापासून आमचा स्पेशल खेळाडू आहे, विशेषत: त्याची या मैदानावरील कामगिरी अतिशय उत्कृष्ट आहे.

IND vs PAK : टीम इंडियाचा गोलंदाजीचा निर्णय; शुभमन गिलचे कमबॅक !

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरिस रौफ.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube