Nagpur Crime : नामकरणाच्या कार्यक्रमात शेजाऱ्याच्या पत्नीसोबत नृत्य करु न दिल्याने रागाच्या भरात एका 45 वर्षीय इसमाने दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीयं. ही घटना उपराजधानी नागपूरच्या खरसोली गावात घडली आहे. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी दाम्पत्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मोठी बातमी! तलाठी परीक्षांपूर्वीचं सर्व्हर डाऊन; प्रशासनावर वेळ बदलण्याची नामुष्की
नेमकं काय घडलं?
नागपूरमधील खरसोली गावात नामकरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात डिजे लावण्यात आला होता. नामकरणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आलेल्या काही पाहुण्यांनी डिजेच्या तालावर ठेका धरला होता. याचदरम्यान, आरोपी दिनेश पाटील(45) याने सुखदेव उईके(55) यांच्या पत्नीशी नामकरण समारंभात नाचण्याबाबत विनंती केली.
‘शरद पवारांना एकदाही स्वबळावर मुख्यमंत्री..,’; दिलीप वळसे पाटलांची पहिल्यांदाच टीका
मात्र, सुखदेव उईके यांनी त्यांच्या पत्नीसोबत नृत्य करण्यास नकार दिला. त्यानंतर उईके आपल्या पत्नीसोबत नृत्य करीत होते. आपल्यासोबत नृत्य करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन आरोपी दिनेश पाटीलने उईके यांच्यासोबत शाब्दिक वाद करण्यास सुरुवात केली.
रोहित पवारांनी धाडले थेट गडकरींना पत्र, कारण तरी काय ?
या वादानंतर आरोपी दिनेश पाटीलने उईके दाम्पत्यावर धारदार चाकूने वार केला. त्यानंतर आरोपी दिनेश तेथून फरार झाला. या घटनेनंतर उईके दाम्पत्यांना तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, या प्रकरणी हुडकेश्वर पोलिस ठाण्यात आरोपी दिनेश पाटील विरोधात कलम 307, 324 नूसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.