समृद्धीवर तंत्र-मंत्र! पूजा करून अपघातग्रस्तांना श्रद्धांजली; तरूणाविरोधात गुन्हा दाखल

Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात […]

Accident

Samruddhi highway Vidarbha travels bus accident Buldhana 26 died

Samruddhi Mahamarga Accident : जुलै महिन्याची सुरुवातच समृद्धी महामार्गावरील खासगी ट्रॅव्हल बसच्या भीषण अपघाताने झाली. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर या महामार्गावरील एका घटनेची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अपघातातील मृतांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र, त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करण्यात आल्याने निलेश रामदास आढाव या तरुणाविरोधात जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 2 आणि 3 अंतर्गत सिंदखेड राजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

समृद्धी महामार्ग बस अपघात : प्रवाशांचे फक्त सांगाडे, ओळख कशी पटविणार ?

सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला होता. 1 जुलै रोजी ही दुर्घटना घडली होती. या अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला. समाजमन सुन्न झाले. या परिसरात अनेक अपाघात झाले आहेत. त्यामुळे स्वामी समर्थ केंद्र, सिंदखेड राजाच्या वतीने येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महामृत्यूंजय यंत्र स्थापित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मंत्राचा जपही करण्यात आला.

आता या अपघातातील 25 जणांच्या आत्म्यास शांती मिळावी व भविष्यात अपघात होऊ नये या हेतूने हा विधी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. सिंदखेड राजा केंद्राचे प्रतिनिधी निलेश आढाव यांनी याकामी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे आणि पुजेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून अशी पूजाअर्चा केल्याने अपघात होणार नाहीत असा दावा करण्यात आला होता. याची दखल घेत सिंदखेड राजा पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

‘समृद्धी’वर 26 जणांचा मृत्यू : रस्त्यावरील त्रुटी सांगत गडकरींनी 4 दिवसांपूर्वीच काढले होते वाभाडे

अंनिस आक्रमक, पोलिसांची तत्काळ कारवाई

दरम्यान, या प्रकारामुळे वाद होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण, अंधश्रद्धा निर्मुलन समितीने याला विरोध केला आहे. दैवीशक्तीचा दावा करणे आणि त्यातून लोकांना फसवणे, ठगवणे हा जादूटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. बुलढाणा पोलीस अधीक्षकांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली होती. स्वामी समर्थ साधकांनीही याचा निषेध करावा, असेही दाभोलकर म्हणाले आहेत.

 

Exit mobile version