Download App

Paplet पकडण्यावर सरसकट बंदी नाहीच, पापलेटला मिळणार जीआय मानांकन; मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं

Paplet fish : पापलेट मासा (Paplet fish)हा प्रामुख्यानं समुद्रात मिळतो. त्याला काही महिन्यांपूर्वीच राज्यमासा (State fish)म्हणून घोषित केला. या संदर्भामध्ये 13.5 सेंटिमीटरचा पापलेट मासा पकडता येणार नसल्याचे मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar)यांनी सांगितले. जो पर्यंत मासा प्रजननक्षम होत नाही तोपर्यंत मासा पकडता येणार नाही. त्याचबरोबर या माशाचं जीआय मानांकन (GI rating)करण्याचं ठरवल्याचंही यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

CBSE 10th Exam : सीबीएससी बोर्डाकडून परीक्षेच्या तारखा जाहीर; 15 फेब्रुवारीपासून परीक्षेला सुरुवात

पापलेट मासा पकडण्यासाठी सरसकट बंदी नसून त्यांची पिल्ल पकडण्यासाठी बंदी असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले. कोणतीही परवानगी न घेता आणि छोटे मासे जेव्हा पकडले जातात, त्यामुळे भविष्यामध्ये मासेटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Animal:… असा शूट झाला ‘बॉबी देओल’’चा एण्ट्रीचा सीन? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?

त्यामुळे आत्तापर्यंत आपण 609 विविध प्रकारच्या अवैध मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यातून अंदाजे तीन कोटी रुपयांचा दंड त्यांच्याकडून वसूल करण्यात आला आहे. पापलेट मासा राज्यमासा म्हणून काही महिन्यांपूर्वीच घोषित केला.

त्यानंतर आता पापलेट माशाला जीआय नामांकन केलं जाणार आहे. त्या माध्यमातून या माशाचं वैशिष्ट हे एक्सपोर्ट करताना लोकांपर्यंत पोहोचवतोय, असेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पापलेट मासा हा राज्यमासा जरी घोषित केला असला तरी पापलेट मासा खाण्यासाठी तर सर्वच ठिकाणी मिळेल. फक्त त्या माशाचा दर जास्त असल्यामुळे जास्त प्रमाणामध्ये हा मासा मच्छिमार बांधवांना पोहोचवण्याच्या दृष्टीनं त्यांना पकडण्याच्या दृष्टीनं, त्यांचं संरक्षण राज्य मासा घोषित करताना केलेलं आहे, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

Tags

follow us