Download App

Nana Patole कार्यक्रमाला आले नाही म्हणून आयोजकाचा घरी जाऊन संताप, व्हिडिओ व्हायरल

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या घरी नागपूरच्या एका सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. नाना पटोले यांच्या स्वीय सहाय्यकाने आपली दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा करत नाना पटोलेंच्या घरी या सराफ व्यावसायिकाने गोंधळ घातला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

वड्याचे तेल वांग्यावर, हे काम ठाणे महानगरपालिकेचे नव्हे

नेमकं प्रकरण काय?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नागपूरातील सराफ बाजार मित्र मंडळाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात नाना पटोले हजेरी लावणार असल्याचं आम्हाला स्वीय सहाय्यक उमेश डांगे यांच्याकडून सांगण्यात आल्याचा दावाही या सराफ व्यावसायिकाने केला आहे. नितीन साळवे असं या सराफ व्यावसायिकाचं नाव असून त्यांनी नाना पटोले यांनी कार्यक्रमाला बोलविल्याचं म्हटंलय.

Pathan : यशराज फिल्म्सच्या पठानची सहाव्या रविवारीही जादू कायम !

8 ते 10 दिवसांपासून सराफ बाजार मित्र मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची तयारी सुरु होती. त्यासाठी आम्ही दोन ते अडीच लाख रुपये खर्च केला असल्याचंही साळवे यांनी म्हटंलय.

नितीन साळवे यांचं नागपूरातील सराफ बाजार परिसरातील टांगा स्टॅंड परिसरात सराफाचं दुकान असून सराफ असोशिएशने शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं. नाना पटोलेंच्या स्वीय सहाय्यकाच्या सांगण्यावरुन पटोले कार्यक्रमाला येतील, असे समजून आम्ही कार्यक्रमाची पूर्ण तयारी केली.

…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले

या कार्यक्रमाबाबत पटोलेंना सांगण्यात आलं होतं. माझे आजोबा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असल्याचंही ते व्हिडिओमध्ये म्हंटले आहेत. पण या कार्यक्रमाला केवळ उमेश डांगेंमुळे नाना पटोले आले नसल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय.

…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले

नाना पटोले कार्यक्रमाला न आल्याने आमची सराफ बाजारात बेईज्जती झाल्याचा दावाही साळवे यांनी केला आहे. सराफ बाजार मित्र परिवाराच्यावतीने गेल्या 8 दिवसांपासून तयारी सुरु होती.

दरम्यान, नाना पटोले यांच्या घरी जाऊन नितीन साळवे यांनी पटोलेंच्या स्वीय सहाय्यकाशी हुल्लडबाजी केल्याचं दिसतंय. नाना पटोले कार्यक्रमाला न आल्याने साळवे यांनी यावेळी संताप व्यक्त केला आहे.

Tags

follow us