NCP News : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या जहरी टीकेने राष्ट्रवादीचे (NCP News) कार्यकर्ते प्रचंड संतापले आहेत. ठिकठिकाणी आंदोलने करून झाल्यानंतर आता त्यांनी पुढला निर्णय घेतला आहे. पडळकरांना काळं फासा आणि एक लाख मिळवा अशी घोषणाच अजित पवार यांच्या गटातील नागपूर शहराध्यक्षांनी केली आहे. या घोषणेनंतर राजकीय वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवार गटाचे नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, पडळकर दिसतील तिथे भर चौकात जोड्यानं मारा. नंतर पडळकरांना काळं फासून नागपुरला येत एक लाख मिळवा हे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना करत आहे. पडळकर नागपुरात आले तर त्यांना आमच्या स्टाइलने धडा शिकवू असा इशाराही पवार यांनी दिला.
Prakash Raj: ‘नेमकं रिकामं काय…? नरेंद्र मोदी…’, अभिनेते प्रकाश राज यांनी पुन्हा उडवली खिल्ली
अजित पवार राज्य सरकारमधील (NCP) जबाबदार पदावर आहेत. त्यामुळे सरकारमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीविरोधात पडळकरने वादग्रस्त वक्तव्य करण म्हणजे बालिशपणा आहे. पडळकरांची अजित पवारांवर बोलण्याची लायकी सुद्धा नाही. कोल्हापूर येथील त्यांच्या मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणाचीही माहिती काढत पाठपुरावा करण्यात येईल. पडळकर नावाचा व्यक्ती फुकट प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही बडबडत असतो. धनगर समाजासाठी खूप काही केल्याचा आव आणणाऱ्या पडळकरने कोणत्याही समाजासाठी काहीच केले नाही. त्यामुळे त्याने आता आपली पायरी ओळखून वागावे, असा इशारा पवार यांनी दिला.
त्यांची (अजित पवार) भावना आमच्याबद्दल स्वच्छ नाही. त्यामुळं त्यांना पत्र देण्याची गरज नाही. लबाड लांडग्याचं पिल्लू आहे ते. त्यामुळं त्यांना आम्ही मानत नाही. म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं नाही आणि यापुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळतो त्या दोघांना मी पत्र दिलं आहे, असे पडळकर म्हणाले होते.
गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे. तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशा प्रकारच्या भाषेचा उपयोग करू नये असं माझं मत आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. तर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पडळकरांना मोलाचा सल्ला दिला होता. पडळकरांनी स्वतःला आवर घालावा.
गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष अनेक दिवसांपासूनचा आहे. ते एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे होते. आपण आता एकत्र असल्याने त्यांनी विधान करताना स्वतःला आवर घालावा. सरकारच्या स्थिरतेसाठी आपसातले मतभेद बाजूला ठेवावेत, असे विखे पाटील म्हणाले होते.
Rohit Pawar : तरीही अजितदादांचे सहकारी गप्प का? रोहित पवारांना वेगळाच संशय