Download App

कराळे मास्तरचा मतदारसंघ ठरला, कुठून आणि कोणत्या पक्षाकडून लढणार?

  • Written By: Last Updated:

नागपूर : बे पोट्टेहो असं म्हणत आपल्या वैदर्भीय बोलीतून स्पर्धा परीक्षांचे धडे देणारे नितेश कराळे (Nitesh Karale) हे नाव आता महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे. वर्धा जिल्ह्यातील कराळे मास्तर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. दरम्यान, आज कराळे मास्तर यांनी आपल्या अधिकृत X खात्यावरून काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं. इतकंच नाही तर त्यांनी आपण कोणत्या मतदार संघातून विधानसभा निवडणूक (Assembly Elections) लढवणार, हेही स्पष्ट केलं.

नमो शेतकरी महासन्मान योजनेला निधी मंजूर, 1720 कोटींची मान्यता, लवकरच जमा होणार पैसे 

नितेश कराळे यांची शिकवण्याची वेगळी स्टाईल आहे. त्या स्टाईलमुळं ते मुलांमध्ये प्रसिध्द आहेत. स्पर्धा परीक्षांच्या धडे देण्याबरोबरच ते सत्ताधाऱ्यांच्या धोरणावरही टीका करत असतात. अनेकदा त्यांची भूमिका ही कॉंग्रेसला पूरक असल्याचं दिसतं. अलीकडेच कॉंग्रेसच्या जनसंवाद यात्रेतही सहभागी झाले होते. तर राज्य सरकारच्या कंत्राटी भरती निर्णयाविरोधात ते गेल्या काही दिवसांपासून वर्ध्यात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. कराळे हे काही महिन्यांपासून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात त्यांच्या व्हिडीओच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. यातून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लक्षात येत होती.

कराळे यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यात त्यांनी घेतलेली मते प्रमुख राजकीय पक्षांसाठी लक्षवेधी ठरली होती. मात्र, कराळेंचा या निवडणूकीत पराभव झाला होता. मात्र, त्यानंतरच ते राजकारणात सक्रिय होतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.

अनेक दिवसांपासून त्यांचा प्रवास हा कॉंग्रेस पक्षाच्या दिशेने सुरू होता. माजी मंत्री आणि आमदार यशोमती ठाकूर यांचे ते निवकटवर्तीय आहेत. त्यामुळे कराळे मास्तर हे आगामी काळात काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आता खुद्द कराळे यांनीच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पुलगाव किंवा वर्धा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

दरम्यान, कॉंग्रेस पक्षात गेलो तरी जनतेचा आणि विद्यार्थ्यांचा आवाज उठवायला कुणाला घाबरणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कराळे हे तरुणाईमध्ये फेमस आहेत. ते कॉंग्रेसमध्ये गेल्यास भाजप नेत्यांची चांगलीच डोकेदुखी होणार.

 

 

Tags

follow us