Download App

ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना धमक्यांचे फोन; काय आहे प्रकरण?

  • Written By: Last Updated:

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजाकडून राज्यभर आंदोलन केलं जातं आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्या ओबीसी समाजाच्या आहेत. दरम्यान, ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taiwade) यांना धमकी देण्याच आल्याचा प्रकार समोर आला आहे.

स्वत: तातवाडे यांनी याबाबतची माहीती दिली आहे. मला धमकीचे फोन येऊ लागले आहेत. अजूनही फोनवरून धमक्या दिल्या जात आहेत. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांत तक्रार करू, असं तायवाडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

चंद्रपुर येथील आमरण उपोषण सोडविल्यानंतर डॉ. तायवाडे हे नागपुरातील संविधान चौकातील आंदोलनस्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी मुंबईतील बैठकीत सरकारशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. सरकारने ओबीसी समाजाच्या एकूण बावीस मागण्या केल्या आहेत, असं सांगत त्यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

शिवरायांच्या वाघनख्यांवरून आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवारांमध्ये राजकीय ‘ओरखडे’ 

यावेळी बोलतांना तायवाडे म्हणाले, सरकारसोबतच्या बैठकीचे मिनिट्स आणि रेकॉर्डींग करण्यात आले आहे. त्यामुळं कुणी शंका घेण्याचं कारण नाही. चंद्रपूरमधील उपोषण सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः चंद्रपूरला आले होते. सरकारने दिलेली आश्वासने ते पूर्ण करतील असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरातही आंदोलन स्थगित करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

काही लोक धमक्या देणारे फोन करताहेत
तीन आठवड्यांच्या आंदोलनादरम्यान, काही लोक धमक्या देणारे फोन करत आहेत. मी जे काही माध्यमांसमोर किंवा सार्वजनिकरित्या बोललो, त्याचा चुकीचा अर्थ काढून धमक्या दिल्या जात आहेत. धमकी देतांना तुम्ही असं बोललात, तस बोललात असं मला त्यांनी सांगितलं.

पण, मी त्यांना म्हटलं मी काय वाईट बोललो, त्याचं रेकॉर्डींग मला पाठवा. त्याशिवाय, मी तुमच्याशी परस्पर बोलणार नाही. गरज भासली तर त्या संदर्भात पोलिसांत तक्रार करणार आहे. जेव्हा माणूस समाजासाठी समर्पित असतो, तेव्हा अशा धोक्यांना घाबरण्याची गरज नसते. आम्ही कोणाच्या विरोधात नाही. आम्ही घटनात्मक हक्कांसाठी लढत आहोत. मरेपर्यंत ही लढू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us