Download App

एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा…रोहित पवारांचे अजितदादांना सडेतोड प्रत्युत्तर!

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On Ajit Pawar वाशिमः कर्जतमध्ये झालेल्या विचार मंथन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटावर जोरदार निशाणा साधत मोठे गौप्यस्फोट केले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह रोहित पवारांवर (Rohit Pawar) अजित पवारांनी जोरदार टीका केली. रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रेची खिल्ली अजित पवारांनी उडविली आहे. त्याला आता आमदार रोहित पवारांनी त्याच पद्धतीने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. एसी हॉलमध्ये राहून एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन आपल्यापदाचा वापर करा, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

…म्हणून अनिल देशमुखांचं मंत्रिमंडळातून नाव वगळलं; अजितदादांनी सांगितलं खरं

काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून फिरत आहेत. कधी आयुष्यात संघर्ष केला नाही आणि आता कशाचा संघर्ष, असा टोलाही रोहित पवारांना अजित पवारांनी लगावला आहे. युवा संघर्ष यात्रेदरम्यान वाशिम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथे जाहीर सभेत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

आमच्या लोकांना दगाफटका करणारं विश्वासघातकी सरकार, गुन्हे मागे न घेतल्यानं जरांगेचं टीकास्त्र

रोहित पवार म्हणाले, काही लोक म्हणतात. आम्ही संघर्ष करत नाहीत. तसं बघितले तर आम्ही खरचं संघर्ष करत नाही. कारण की संघर्ष कोण करतंय या महाराष्ट्रात. राज्यातील सामान्य जनता, युवा संघर्ष करत आहेत. त्यांच्याकडे डिग्री आहे पण नोकरी नाही. ते संघर्ष करत आहे. छोटे-मोठी व्यवसायिक वर्षांनवर्ष तेवढाच व्यवसाय करतात. व्यवसाय वाढूच शकत नाही. परिसरात विकास होत नाहीत. विद्यार्थी, पालक संघर्ष करत आहेत. आमच्यापेक्षा जास्त संघर्ष हे लोक करत आहे.

आमची युवा संघर्ष यात्रा त्या फक्त संघर्षाचे छोटेसे प्रतिक आहे. पण एसी हॉलमध्ये राहून एखाद्या हॉटेलमध्ये बसून भाषणे करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन आपल्यापदाचा योग्य वापर करणं. लोकांचे अडचणी सोडण्याची आवश्यकता आहे. हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. आतापर्यंत संघर्ष यात्रेत चालत असताना सोयाबीन उत्पादक शेतकरी भेटले आहे. पाच हजार रुपये भाव आम्हाला परवडत नाही. आम्हाला नऊ हजाराचा भाव कसा होईल, असे शेतकरी विचारत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.

Tags

follow us