Download App

संजय गायकवाडांच्या गळ्यात विजयाची माळ, ठाकरे गटाच्या उमेदवाराचा 1300 मतांनी पराभव

Buldhana Assembly Election Result 2024: बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) विजयी झालेत.

  • Written By: Last Updated:

Buldhana Assembly Election Result 2024: बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) विजयी झालेत. त्यांनी ठाकरे गटाच्याा जयश्री शेळकेंचा (Jayashree Shelke 1300 मतांनी पराभव केला.

14 फेऱ्यांमध्ये अमोल खताळच जोमात; बाळासाहेब थोरात अद्यापही पिछाडीवरच… 

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून जयश्री शेळके तर शिंदे गटाकडून संजय गायकवाड रिंगणात होते. गायकवाड आणि जयश्री शेळके यांच्यात काट्याची टक्कर झाली होती. मात्र, एक्झिट पोलमध्ये जयश्री शेळके यांच्या विजयाची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, जनतेनं संजय गायकवाड यांना कौल दिली.  गायकवाड यांनी 91 हजार 660 एवढी मते मिळाली. तर जयश्री शेळकेंना  90 हजार 819 मते मिळाली.

Prithviraj Chavan Defeat : काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पराभूत 

तर वंचित बहुजन आघाडीच्या प्रशांत वाघमोडेंना तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले आहेत. त्यांना 7146 इतकी मते मिळाली.

2019 ला काय झालं होतं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीतही बुलढाणा मतदारसंघातून संजय गायकवाड विजयी झाले होते. बुलढाणा मतदारसंघातील जय-पराभवातील फरक 26075 इतका होता. 2019 मध्ये संजय गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विजय हरिभाऊ शिंदे यांचा पराभव केला.

follow us