Sanjay Gaikwad : महाराष्ट्राच्या निकालातून (Vidhansabha Election) चकीत करणारे आकडे समोर आलेत. यातच अनेक पराभूत उमेदवारांसोबतच विजयी उमेदवारांकडूनही दावे-प्रतिदावे केले जाताहेत. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे फायरब्रँड नेते आणि नवनियुक्त आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी आपल्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) आणि भाजपचे आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
महाविकास आघाडीच्या दिग्गज उमेदवारांची निवडणुकीत हार झाल्याने अनेकांकडून अंतर्गत कलहांवर बोट ठेवले जातेय. तर आता महायुतीतील धुसफूससमोर येऊ लागली. विजय खेचून आणण्यासाठी आपल्याला अंतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागल्याची खंत संजय गायकवाड यांनी व्यक्त केली. एका कार्यक्रमात बोलताना गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणूक मी एकटाच लढलो. एकाही पक्षाचा नेत्या माझ्यासोबत नव्हता. भाजपाचे नेतेही सोबत नव्हते. भाजपने तर माझ्या विरोधात उमेदवार निश्चीत केला. तर आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि संजय कुटेंनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केल्याचा आरोप गायकवाड यांनी केला.
निवडणुकीतील पराभवामुळे विरोधक संतापले म्हणून …, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय…
संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जयश्री शेळके रिंगणात होत्या. या दोघांमध्ये थेट लढत झाली. जयश्री शेळके यांना 90 हजार 819 तर संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मते मिळाली. संजय गायकवाड हे अवघ्या 841 मतांनी विजयी झाले.
दरम्यान, आता गायकवाड यांनी आपल्याच केंद्रीय मंत्र्यावर थेट आरोप केल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.