Download App

‘पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना सहकार्य केलं ही चूक’; शरद पवारांनी अमरावतीकरांची माफी मागितली!

Sharad Pawar News : पाच वर्षांपूर्वी नवनीत राणांना (Navneet Rana) सहकार्य केलं ही माझ्याकडून एक चूक झाली, त्याबद्दल अमरावतीकरांची माफी मागत असल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. अमरावतीत आज महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते बोलत होते.

‘खडकवासला’ कोणाला पाजणार पाणी? भाजपच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा मुक्काम, सुळेंचीही फिल्डिंग

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे की, एक चूक माझ्याकडून झाली. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या. लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि ज्यांना पाठिंबा दिला, त्यांना खासदार केलं. पण 5 वर्षांचा त्यांचा अनुभव बघितल्यानंतर माझ्या मनात अस्वस्थता होती की, कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की, आमच्याकडून चूक झाली. ती चूक पुन्हा कधी होणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

YRF ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; चित्रपटातून गाणे काढून टाकल्याप्रकरणी भरपाई द्यावी लागणार नाही

तसेच ती चूक आता दुरुस्त करायची असून ती चूक दुरुस्त करण्यासाठी ज्याचं सामाजिक जीवन आणि व्यक्तिगत जीवन हे अत्यंत स्वच्छ आणि शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार करणारं आहे, अशा बळवंत वानखेडेंना मोठ्या मतांनी इथून विजयी करा हे सांगण्यासाठी याठिकाणी आलो असल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

अनेकांना संसदरत्न मात्र शिरूरच्या खासदारांकडून त्याचं भांडवल; आढळरावांची कोल्हेंवर टीका

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या होत्या. त्यावेळी शरद पवारांनी सभा घेत नवनीत राणांना मतदान करावे असं आवाहन केलं होतं. मात्र आता ही आपली मोठी चूक होती, असं शरद पवारांनी म्हटलंय.

follow us