धक्कादायक! आ. प्रणिती शिंदेंच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न; भाजप समर्थकांवर शिंदेंचा आरोप
Solapur News : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू (Lok Sabha Election) झाली आहे. नेते मंडळींनी प्रचाराला वेग दिला आहे. गावोगावी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. यातच एक धक्कादायक बातमी सोलापूर जिल्ह्यातून (Solapur News) आली आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे काल (Praniti Shinde) पंढरपूर तालुका दौऱ्यावर होत्या. यावेळी तालुक्यातील सरकोली गावाजवळ त्यांच्या वाहनावर हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जमाव वाहनाडी तोडफोड करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दरम्यान, हा हल्ला करणारी भारतीय जनता पार्टीचे लोक होते असा आरोप आ. प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
Praniti Shinde यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुशीलकुमार शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले आमच्या मनात..
मागील काही दिवसांपासून प्रणिती शिंदे मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. त्यात काल काँग्रेसने लोकसभेसाठी जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत प्रणिती शिंदे यांचे नाव होते. सोलापूर मतदारसंघातून त्यांना तिकीट देण्यात आले आहे. यानंतर काल शिंदे पंढरपूर तालुका दौऱ्यावर होत्या. यावेळी एका गावात त्यांना गावकऱ्यांकडून जाब विचारण्यात आला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या नेत्यांनाही गावबंदी करावी अशी मागणी केली होती. त्या सरकोली गावाकडून सोलापूरकडे येत असताना त्यांची कार अडवण्यात आली. यावेळी आपल्या वाहनावर भाजप समर्थक लोकांनी हल्ल्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.
ते मराठा आंदोलक नव्हते तर मराठा आंदोलकांच्या नावाने भाजपाचे लोक होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन बदनाम करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे, असे प्रणिती शिंदे यांनी यावेळी सांगितले. त्यानंतर प्रणिती शिंदे यांनी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या राजकीय नेत्यांच्या गावबंदी आंदोलनाला प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.
सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (Congress) महाराष्ट्रातील सात जणांची उमेदवारी काल घोषित करण्यात आली. पुणे लोकसभा मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar), सोलापूरमधून आमदार प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजीराव काळगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडावी यांना उमेदवार जाहीर झाली आहे.