Download App

“फडणवीस हेच मंत्री, बाकी सर्व बिनखात्याचे मंत्री”, ठाकरेंच्या आमदारांंचा खोचक टोला

राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

Maharashtra Winter Session : विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आजच्या दिवशीही विरोधक आक्रमक झाल्याचे दिसले. महायुती सरकारच्या ३९ आमदारांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली पण, खातेवाटप अजूनही झालेलं नाही. हाच धागा पकडत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली. राज्यात ४२ मंत्री खात्यांविना आहेत. खरे मंत्री फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत असा खोचक टोला जाधवांनी लगावला. राज्यात ४२ मंत्र्यांनी शपथ घेतली पण घटनात्मक दृष्ट्या देवेंद्र फडणवीस हेच मंत्री आहेत. बाकी सर्व मंत्री हे बिनकामाचे आणि बिनखात्याचे आहेत असेही भास्कर जाधव म्हणाले.

बऱ्याच वर्षापासून गृहखात असल्याने त्यांचा आकडे लावण्याशी संबंध..; भास्कर जाधवांची फडणवीसांवर टीका

जाधव पुढे म्हणाले, मला असं वाटतं की आता भविष्यात मंत्री विचार करतील की मंत्री म्हणून आम्हाला सोयी सुविधा मिळाव्यात पण काम मात्र काहीच नको. आम्ही बिनकामाचे मंत्री असावे असे त्यांना वाटलं असेल. आता तर तुम्ही सर्व जण बिनकामाचे मंत्री आहात. तुमच्या नावाने या विक्रमाची नोंद आज देशभरात झाली म्हणून मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो असा खोचक टोला भास्कर जाधव यांनी लगावला.

यानंतर त्यांनी राज्य सरकावर घणाघाती टीका केली. राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या गंभीर मुद्द्यांवर त्यांनी सरकारला जाब विचारला. अधिवेशनाच्या काळात आपण शेतकरी, उद्योग, कायदा आणि सुव्यवस्था यांबद्दल चर्चा केली नाही. महायुती सरकारच्या काळात एकट्या विदर्भात तब्बल सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. फक्त याच सरकारच्या काळात आत्महत्या झाल्या असे मी म्हणणार नाही.  पण याच सरकारच्या काळात सात हजार आत्महत्या झाल्या हा सर्वात मोठा विक्रम म्हटला तर वावगं होणार नाही असेही भास्कर जाधव यांनी सभागृहात सांगितलं.

महायुतीत नाराजीची लाट! नाराजांनी अधिवेशन सोडले; भाजप समर्थक आमदार थेट घरी

follow us