समृध्दी महामार्ग श्रीमंतांसाठी बनवलेला रस्ता – नाना पटोले

नागपूर : नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय. बहुप्रतिक्षेनंतर अखेर समृध्दी महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. हा समृध्दी महामार्ग गरिबांसाठी नसून श्रीमंतांसाठी बनवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. ते म्हणाले, ज्या समृध्दी महामार्गाची प्रशंसा शिंदे-फडणवीसांकडून केली जात आहे, त्याच महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. ज्या गाड्यांचा अपघात झालाय […]

Untitled Design (45)

Untitled Design (45)

नागपूर : नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते समृध्दी महामार्गाचं लोकार्पण करण्यात आलंय. बहुप्रतिक्षेनंतर अखेर समृध्दी महामार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात आलाय. हा समृध्दी महामार्ग गरिबांसाठी नसून श्रीमंतांसाठी बनवण्यात आल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय.

ते म्हणाले, ज्या समृध्दी महामार्गाची प्रशंसा शिंदे-फडणवीसांकडून केली जात आहे, त्याच महामार्गावर अनेक अपघात होत आहेत. ज्या गाड्यांचा अपघात झालाय त्या सर्व गाड्या गरिब लोकांच्या आहेत.

लोकांच्या खिशातल्या पैशांनी बांधलेल्या समृध्दी महामार्गावरील अपघातांकडे सरकार दुर्लक्ष करत असून या महामार्गाचं कौतूक करताना शिंदे-फडणीस सरकार कमी पडत नसल्याची उपरोधिक टीका त्यांनी केलीय.

तसेच सत्तासंघर्षाच्या सुनावणीबद्दलही त्यांनी मोठं वक्तव्य केलं असून सर्वोच्च न्यायालयाने आता 14 फेब्रुवारीची तारीख दिलीय. तर दुसरीकटडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सात सदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचची मागणी करण्यात आलीय. त्यांची मागणी बरोबर असल्याचं त्यांनी म्हंटलंय.

सत्तासंघर्षाचं सुनावणी प्रकरण न्यायालयात असतानाही निवडणूक आयोगाकडून हस्तक्षेप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे चिन्ह वाटप सुरू आहे, या सर्व गोष्टी कुठेतरी निवडणूक आयोगाने थांबवल्या पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केलीय.

दरम्यान, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आज कार्यकारणीची बैठक सुरु असून समृध्दी महामार्ग हा रस्ता गरिबांसाठी नसून श्रीमंतासाठी बनवलेला रस्ता असल्याचं ते म्हणाले आहेत.

Exit mobile version