Sushma Andhare : राहुल गांधींची खासदारकी रद्द करणे हा नरेंद्र मोदींचा पराभव

नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (2)

Httpswww.canva.comdesignDAFcJmY7 AA2pbVhvfb_idY9UrtjK05lwviewium=link&utm_source=shareyourdesignpanel (2)

नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही त्यांची परम जबाबदारी आहे या न्यायाने ते वागत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली. ही कारवाई लोकशाहीची हत्या करणारी आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर केला आहे.

त्या पुढं म्हणाल्या, आता ते ओबीसीच्या मुद्दाच्या आडून राजकारण करायला बघत आहेत. भाजपाने दरवेळेला जातीचे आणि धर्माची कार्ड खेळणं बंद कराव. ओबीसीबद्दल जर इतकं प्रेम भाजपाला असेल तर ओबीसीचा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे? ओबीसीबद्दल एवढं प्रेम खरंच भाजपाला वाटत असेल तर भाजपाने ओबीसीच्या नेतृत्वांना कुजवत का ठेवलं? असा सवाल करत त्या म्हणाल्या या सगळ्या मुद्द्यांवरती भाजपाने फार आकांड तांडव करण्याची गरज नाही.

अमित शहा ‘मोगॅम्बो’ नव्हे ‘मिस्टर इंडिया’; शिंदेंनी सांगितला विरोधकांचा ‘कद्रूपणा’

राहुल गांधींवरील कारवाई चुकीची आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत राहू. आता राहुल गांधींना इग्नोर करूच शकत नाहीत. या स्टेजमध्ये जेव्हा राहुल गांधी स्वतःची इमेज तयार करतात तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, अशी टीका त्यांनी भाजपवर केली आहे.

सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. दोन तारखेला संभाजीनगरला होणाऱ्या सभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. उद्याच्या मालेगावच्या सभेत चर्चेला येईल. त्यामुळे हा प्रश्न फक्त राहुलजींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकतंत्राचा प्रश्न आहे. त्यामुळे यावर सगळेच पक्ष एक होत आहे, असे त्यांनी सांगितले.

Exit mobile version