Download App

Talathi online Exam : तलाठी परीक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार थांबेना! आता अमरावतीतून एकाला घेतलं ताब्यात…

Talathi online Exam : राज्यभरात सुरु असलेल्या तलाठी भरती परिक्षेत हायटेक कॉपीचे प्रकार अद्यापही सुरुच आहेत. नाशिक नागपूरनंतर आता पुन्हा अमरावतीत हायटेक उपकरणांसह पेपर फोडणाऱ्या एका उमेदवाराला ताब्यात घेण्यात आलं आहे. अमरावतीतल्या एका परिक्षा केंद्रावर एका उमेदवाराला हायटेक उपकरणांसह अटक करण्यात आली असून सध्या या आरोपीची अमरावती पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

अमरावतीमधील माधव इन्फोटेक अमरावती ड्रेमलॅड मार्केट परिक्षा केंद्रात हा उमेदवार गैरप्रकार करत असल्याचं समोर आलं. त्यानंतर हायटेक कॉपी करणाऱ्या या उमेदवाराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, सध्या अमरावती पोलिस ठाण्यात त्याची चौकशी सुरु असून अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.

Jawan: किंग खानच्या ‘जवान’मधील डायलॉगवरुन नवा वाद पेटला; करणी सेनेने दाखल केली तक्रार

तलाठी परीक्षा सुरु झाल्यापासूनच सुरुवातील नाशिकमध्ये गैरप्रकार घडल्याचं समोर आलं होतं. नाशिकमधील म्हसरुळ परिसर केंद्राबाहेरुन एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं होतं, त्याच्याकडूनही मोबाईल, टॅब, हेडफोन जप्त करण्यात आले. एका मोबाईलमध्ये काही संगणकावरील प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळल्याने खळबळ उडाली होती.

जाळपोळीच्या घटना वाढल्याने जालन्यात उद्यापासून 17 सप्टेंबर पर्यंत जमावबंदी; जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश

गैरप्रकाराच्या प्रकारानंतर तलाठी परीक्षा चर्चेत असतानाच अकोला जिल्ह्यात तलाठी भरती परिक्षा केंद्रावर काही तांत्रिक बिघाड झाल्याचं समोर आलं होतं. डाटा सर्व्हरमध्येच बिघाड झाल्याने केंद्रावरील 12 :30 वाजता सुरु होणारी परिक्षा 2 वाजता सुरु करण्यात आली. ज्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची परिक्षा होती, त्यामध्ये टीसीएसकडून बदल करण्यात आले. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप करावा लागला होता.

दरम्यान, राज्यात तलाठी भरती परीक्षा 17 ऑगस्टपासून सुरु झाली असून परीक्षा सुरु झाल्यापासून गैरप्रकार झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. हायटेक कॉपी, ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना एकच चिंता लागली आहे.

Tags

follow us