Uddhav Thackeray’s Vidarbha Tour : शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आता मैदानात उतरले आहेत. आजपासून त्यांनी महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. या दौऱ्याची सुरुवात वाशिम येथील पोहरादेवीच्या दर्शनाने केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही.
पोहरादेवीच्या दर्शनाआधी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले की आता अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही?
पूर्वी पक्ष फोडला जायचा आता पळवून नेताहेत, बंडावर उद्धव ठाकरेंची टीकेची झोड…
मविआ असताना अजित पवार व राष्ट्रवादीने आमच्यावर अन्याय केला. म्हणून आम्ही मविआतून बाहेर पडलो, असे शिंदे गट सांगत होता. आता त्याच राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून ते पुन्हा सत्तेत बसले आहेत. यावरुन शिंदे गटाचे ढोंग आता उघडे पडले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
बंजारा समाचाजी काशी अशी ख्याती असलेल्या यवतमाळमधील दारव्हा-दिग्रस येथील पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. या दौऱ्यातून शिंदे गटात गेलेले आमदार संजय राठोड यांना ठाकरे गटाकडून आव्हान दिले जाणार आहे.
NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं कारण…
उद्धव ठाकरे आज आपल्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात यवतमाळ, वाशीम, अमरावती, अकोला आणि नागपूर या पाच जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधणार असून प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या दौऱ्यासाठी विदर्भातील शिवसैनिकांनीही जय्यत तयारी केली आहे.