NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं कारण…

NCP Crisis : शरद पवारांची साथ का सोडली? दिलीप वळसे-पाटलांनी सांगितलं कारण…

NCP Crisis : रोहित पवारांमुळेच मी साहेबांची साथ सोडली असल्याचं अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री दिलीप-वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे. दरम्यान, राष्ट्र्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांनी राज्यभर दौरा करणार असल्याचं जाहीर केलं होतं. माझी पहिली सभा दिलीप वळसे-पाटलांच्या मतदारसंघात घेणार असल्याचं म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटातील नेत्यांना ललकारलं होतं. त्यानंतर अजित पवारांनीही या सभेनंतर आम्हीही सभा घेणार असल्याचं घोषित केलं होतं. त्यानंतर आज दिलीप वळसे पाटलांनी कार्यकर्ता मेळावा घेत संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं असून रोहित पवारांवर टीका केली आहे.

अभिमानास्पद! मेड इन इंडियन ‘ब्रम्होस’च्या खरेदीसाठी जगभरात चढाओढ; या देशांची नावं आघाडीवर

मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, ज्यांचं वय 37 वर्षे आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली की, साहेबांनी तुम्हाला आणखी काय द्यायला हवं, अशी टीका त्यांनी केली आहे. माझी आणि रोहित पवार यांची एकदाच भेट झाली आहे. तुमच्या मतदारसंघात काही प्रश्न असतील तर माझ्या आमदाराकीचा राजीनामा देतो, आणि तुम्ही माझ्या आंबेगाव मतदारसंघातून उभे रहा, असं आवाहन त्यांनी यावेळी रोहित पवार यांना केलं आहे.

Anupam Kher: अनुपम खेर साकारणार महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका

तसेच माझं रोहित पवारांशी कोणताही वाद नसून मी शरद पवार साहेबांच्या विरोधात कधीच जाऊ शकत नाही, असं ठणकावून सांगितलं आहे. त्याचप्रमाणे शरद पवारांची आंबेगावमध्ये होणाऱ्या सभेसाठी कार्यकर्त्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचं आवाहनही केलं आहे.

President Draupadi Murmu साईचरणी लीन; साईबाबांचं दर्शन घेणाऱ्या ठरल्या सातव्या राष्ट्रपती

दरम्यान, मला ईडी, सीबीआय, किंवा आयकर विभागाची नोटीस आलेली नाही. साहेबांची साथ सोडण्यामागे माझं वैयक्तिक हित नाही, आपली लढाई ही शरद पवार साहेबांशी नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. उद्याच्या निवडणुकीत जे काही होईल, त्याची मला चिंता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.



‘त्या’ आरोपांवर वळसे-पाटील म्हणाले :

एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केला तेव्हा मी गृहमंत्री होता. शिंदेंच्या बंडांमुळे माझं पद जाणार, मी देखील सत्तेबाहेर असणार हे सर्व उघड असूनही मी मदत केली, असा आरोप करण्यात आला. याउलट मागील सहा महिन्यांपासून शरद पवारांना, उद्धव ठाकरेंना आमदार फुटणार असल्याचं सांगत होतो, तर मग माझा मदत करण्याचा प्रश्नच कुठं येतो असा सवाल त्यांनी केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube