Underworld Don Arun Gawali Nagpur Bench order : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ( Underworld Don Arun Gawali ) याची मुदतपूर्व सुटका करा. असे निर्देश नागपूर खंडपीठाकडून ( Nagpur Bench order ) देण्यात आले आहेत. शासनाच्या 2006 च्या निर्णयाच्या आधारावर कुख्यात डॉन अरुण गवळीने शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. त्यावर नागपूर खंडपीठामध्ये सुनावली पार पडली. त्यावेळी खंडपीठाने हे निर्देश दिले आहेत.
“पटोलेंचं वक्तव्य असंवेदनशीलतेचा कहर, माफी मागा”; बावनकुळेंनंतर फडणवीसही चिडले
दरम्यान या निर्देशांवर उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला नागपूर खंडपीठाकडून चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे आता जेल प्रशासन अरुण गवळीच्या सुटकेबाबत काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मुंबईतील नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हस्ते प्रकरणी तसेच इतर काही गुन्ह्यांसाठी अरुण गवळी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. त्याला दोन वेळी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.
Mylek Exclusive: ‘करिअरसाठी धक्का देण्याचं काम आईने केलं’; अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली…
मात्र 2006 च्या शासनाच्या कैद्यांबाबतच्या निर्णयानुसार वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त आणि निम्मी शिक्षा भोगलेल्या कैद्यांना शिक्षेत काही प्रमाणात सूट मिळते. त्यानुसार अरुण गवळीकडून शिक्षेतून मुदतपूर्वक सुटका मिळावी. यासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये सुनावणी पार पडली. मात्र त्यावेळी न्यायालयाने हा निर्णय ठेवला होता. मात्र त्यानंतर आता न्यायालयाने अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेसाठी निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता अरूण गवळीची सुटका होण्याची शक्यता आहे.