Mylek Exclusive: ‘करिअरसाठी धक्का देण्याचं काम आईने केलं’; अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली…
Mylek Sonali Khare Exclusive : आई मुलीच्या नात्यात जे प्रेम असतं, त्याच वर्णन कस करायचं झालं तर ते आभाळ माये इतकं आहे, असं म्हणावं लागत. (Mylek Movie) आणि त्या काळातली आभाळ माया एका वेगळ्या अर्थाने आणि त्यातली चिंगी असेल किंवा बंटी असेल यांचं एक वेगळं नातं आपण त्या वेळेला पाहिलेलं. (Marathi Movie ) आता ते मोठे झाले आहेत, वेगवेगळ्या अर्थाने आपण पाहिलेलं ते नातं आता वेगळ्या अर्थाने खुलून आला आहे. ‘मायलेक’ हा नवा मराठी सिनेमा घेऊन अभिनेत्री सोनाली खरे येत आहे. या सिनेमात अभिनेत्री सोनाली खरे (Sonali Khare) ही पहिल्यांदाच नव्या भूमिकेत म्हणजेच निर्माती म्हणून काम पाहणार आहे. आणि आता या सिनेमाच्या अनुभवाबद्दल अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं.
अभिनेत्री सोनाली खरे म्हणाली की, निर्माती म्हणून पहिल्यांदाच काम पाहत आहे, काम करण्याचं दडपण आहे. पण कुठेतरी तो आत्मविश्वास आहे, कारण माझ्यासोबत काम करणारी जी टीम आहे आणि मला जी साथ मिळाली आहे. ती खूप स्ट्राँग आहे. यामुळे माझा विश्वास मला खूप दृढ झाला. आणि आपण हे करू शकतो, असा आत्मविश्वास निर्माण झाला. मग ती माझी आई असेल, नवरा असेल, मुलगी असेल आणि उमेश सारखे सह कलाकार असतील, आणि प्रियांका तन्वर सारखी दिग्दर्शिका असेल, किंवा पूर्ण टीम असेल, यांच्या सपोर्टमुळे हा आत्मविश्वास प्राप्त झाला.
पुढे म्हणाली की, माझं स्वप्न होत किंवा प्रत्येक कलाकाराला असं वाटत असतं की, ऍक्टिंग तर आहेच, पण त्या वैतरिक्त दुसऱ्या पण काहीतरी गोष्टी आयुष्यात करूयात, आणि माझं देखील खूप दिवसापासूनचं स्वप्न होत. प्रोड्युसर बनलं पाहिजे, आता त्याच्यात काहीतरी करायला पाहिजे. त्याच्या स्टेजनी मी माझ्या नवऱ्याला बोलून दाखवलं, आणि त्यावर तो चालेल ना, आपण करूया काहीतरी आणि कथानक शोधायला सुरुवात केली.
‘लव्ह अँड वॉर’मध्ये आलियाची भूमिका कशी असेल? संजय लीला भन्साळींने सांगितला ‘तो’ किस्सा
मग तेव्हा योगायोगाने दिग्दर्शिका प्रियांका हा विषय घेऊन माझ्याकडे आली. आणि जो मलाही खूप भहावला आणि मग ती जी साथ लागते. आणि थोडासा धक्का मारावा लागतो. आणि तो मारल्याशिवाय गाडी वेगाने जात नाही. आणि तो जो धक्का मारण्याचा काम माझ्या नवऱ्यानी केला आहे. आणि जशी मला आई नेहमीच पहिल्यापासून आणि या कला क्षेत्रातल्या करिअरसाठी धक्का देण्याचं काम माझ्या आईने केलं होत. तो धक्का मिळाला आणि चांगला पाठींबा देखील मिळाला. आणि म्हणून फॅमिली आली, असं अभिनेत्रीने थेटच सांगितलं आहे.
या चित्रपटाबदल निर्माती सोनाली खरे पुढे म्हणते, ” मी निर्मित केलेला हा पहिला चित्रपट आहे. या सिनेमात आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. हा सिनेमा माझ्यासाठी खूप भावनिक आहे. या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.