Download App

संतापजनक ! मनोरुग्ण महिलेवर बसस्थानकाच्या टॉयलेटमध्ये सामूहिक अत्याचार, व्हिडिओही व्हायरल केला

नागभीडमधील बसस्थानकाच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Written By: Last Updated:

video of mentally ill woman goes viral in bus station area chandrapur चंद्रपूर: राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना दररोज घडू लागल्या आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांत शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातही एक संतापजनक घटना घडलीय आहे. चंद्रपूरमधील (chandrapur) नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आलाय.


मोदी-योगींचे कौतुक पडले महागात, संतापलेल्या पतीने मारहाण करत दिला तिहेरी तलाक

नागभीडमधील बसस्थानकाच्या निर्जन प्रसाधनगृहात हा प्रकार घडला आहे. ही घटना 12 ऑगस्टच्या रात्री घडली आहे. महिलेवर काही जणांनी अत्याचार केला. तर त्याचा सहकाऱ्याने व्हिडिओ चित्रित करत तो नंतर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील शेकडो नागरिक हे पोलिस ठाण्यात गेले. त्यानंतर पोलिस यंत्रणाही खडबडून जागी झाली. त्यानंतर पोलिसांनी व्हिडिओची तपासणी केल्यानंतर पीडित महिला आणि आरोपींचा शोध सुरू केलाय. या प्रकरणात पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी सुरू केलीय. पूर्ण चौकशी केल्यानंतर काय प्रकार हे हे समोर येईल, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नवा जीआर! शाळांमध्ये CCTV, तक्रार पेटी अन् कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी बंधनकारक

पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेही घटनास्थळी गेले आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही अधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे.

follow us