Download App

Washim : जैन मंदिरात दोन पंथाचा वाद चिघळला, पोलिस बंदोबस्त तैनात…

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता पुन्हा श्वेतांबर पंथीयांनी या ठिकाणी रॅली काढण्यात आली आल्याने पुन्हा दोन गट समोरा-समोर आल्याचे चित्र दिसून आले आहे.

Yogesh Kadam : माझ्या वडिलांना संपवण्याचे कारस्थान मातोश्रीत रचले

जैन धर्मीयांचे २४ वे तीर्थंकार भगवान पार्श्वनाथ यांच्या मंदिरावरून श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथांचा वाद न्यायालयात ४२ वर्षांपासून प्रलंबित होता. फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सदर मंदिर उघडण्याचा अधिकार श्वेतांबर पंथीयांना दिला. मात्र आज यावरून मंदिरात दोन्ही पंथातील लोकांमध्ये मोठा वाद झाला.

मांसाहार करणारे बाऊंसर ठेवल्याने हा वाद उफाळल्याची माहिती दिगंबर पंथीयांचे संजू छाबडा यांनी दिली आहे. शिरपूर जैन येथील भगवान पार्श्वनाथ मंदिर खुले करण्यासाठी आणि मूर्ती लेप करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून २२ फेब्रुवारी रोजी अंतरिम आदेश दिले आणि मंदिर उघडण्यासाठी १० मार्च रोजी प्रशासनाने मंदिराच्या चाव्या श्वेतांवर पंथीयांना दिल्या होत्या.

Shinde-Fadanvis Govt : भुजबळ-महाजन यांचा दुसऱ्यांदा एकत्र विमानप्रवास… राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!

त्यानंतर आज मंदिरात भाविक दर्शनासाठी जात असताना श्वेतांबर पंथीयांचे सुरक्षारक्षक कर्तव्य बजावत होते. त्याचवेळी दिगंबर पंथीयांच्या १०० ते २०० लोकांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी झालेल्या वादात सुरत येथील एक भाविक जखमी झाला आहे.

दरम्यान, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या भगवान पार्श्वनाथांच्या मंदिरावरुन दोन गटांत वाद झाल्याने या वादाची राज्यभरात चर्चा होत आहे. वादावेळी या ठिकाणा तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र सध्या शांततेचं वातावरण आहे. पुन्हा वाद होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली असून पोलिस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.

Tags

follow us